PAK vs NEP, Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीला बुधवारी (३० ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानसमोर नेपाळचे आव्हान होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्याच्याकडून बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ १०४ धावांवर गारद झाला.

पाकिस्तानने आशिया कप २०२३ची सुरुवात विजयाने केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्यांनी नेपाळचा २३८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ २३.४ षटकांत १०४ धावांवर गारद झाला. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध २ सप्टेंबरला खेळायचा आहे. त्याचबरोबर नेपाळचा पुढील सामना भारताविरुद्ध ४ सप्टेंबरला आहे.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
PAK vs BAN Test Ahmad Shahzad mocking on Pakistan team
PAK vs BAN Test Series : लाजिरवाण्या पराभवानंतर अहमद शहजादने पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बांगलादेशने तुम्हाला तुमच्याच…’
World Test Championship 2025 How Pakistan Qualify for Final Match
PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Pakistani team cricketers trolls on social media
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Pakistan drop in the World Test Championship table after defeat against Bangladesh
PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमानने १४ आणि इमाम-उल-हकने ५ धावा केल्या. यानंतर बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. रिझवान ५० चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ४४ धावा करून धावबाद झाला. आघा सलमान ५ धावा करून संदीप लामिछानेचा बळी ठरला. यानंतर मुलतानमध्ये बाबर आणि इफ्तिखारचे वादळ पाहायला मिळाले.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकासाठी टीम इंडिया पोहोचली श्रीलंकेत, २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार महामुकाबला

बाबरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १९वे शतक झळकावले. तो १३१ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५१ धावा करून बाद झाला. दुसरीकडे त्याचा साथीदार इफ्तिखारने ६७ चेंडूत वन डे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. इफ्तिखारने ७१ चेंडूंत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०९ धावा केल्या. शादाब ४ धावा करून नाबाद राहिला. नेपाळकडून सोमपाल कामीने २ विकेट्स घेतल्या. त्याला करण केसी आणि लामिछाने यांना प्रत्येकी एक घेत मोलाची साथ दिली.

हेही वाचा:

प्रत्युत्तरात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांनी नेपाळच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले. संघाने १४ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. कुशल भुरटेल ८ धावा, आसिफ शेख ५ धावा आणि कर्णधार रोहित पौडेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. नेपाळच्या पडझडीनंतर आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. ती भागीदारी हारिसने तोडली, त्याने आरिफ शेखला क्लीनबोल्ड केले. शेखने ३८ चेंडूत २६ धावा केल्या आल्या. यानंतर हारिसने सोमपालला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याला ४६ चेंडूत २८ धावा करता आल्या. त्यानंतर शादाब खानच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने चार विकेट्स घेत नेपाळच्या खालच्या फळीला गुंडाळले. गुलशन झा १३ धावांवर, दीपेंद्र सिंग ३ धावांवर, कुशल मल्ला ६ धावांवर बाद झाले, तर संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी यांना खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून शादाबने चार विकेट्स घेतल्या. त्याला शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मदत केली. नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.