New Zealand vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेतील ३५ वा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडचा २१ धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ४०१ धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे पाकिस्तान संघाला ४१ षटकांत ३४२ धावांचे आणि नवे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने २५.३ षटकांत एक विकेट गमावून २०० धावा केल्या. यानंतर खेळ होऊ शकला नाही आणि पाकिस्तान संघ २१ धावांनी विजयी झाला.
या विजयासह पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची आशा कायम आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा मार्ग कठीण झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावून ४०१ धावा केल्या. रचिन रवींद्रने १०८ धावांची खेळी केली. तर कर्णधार विल्यमसनने ९५ धावांचे योगदान दिले. फिलिप्सने ४१ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन बळी घेतले. हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – IND vs SA, World Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यात काय असेल आव्हान? टेम्बा बावुमाने केला खुलासा
पाकिस्तानकडून फखर जमानने ८१ चेंडूत नाबाद १२६ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने ६३ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली. २५.३ षटकांत पाकिस्तानची धावसंख्या १ बाद २०० धावा होती. यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिका संघाने गाठली उपांत्य फेरी –
पाकिस्तानच्या या विजयाचा दक्षिण आफ्रिका संघाला खूप फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. पाकिस्तान संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकूण आठ सामने खेळले आहेत. दरम्यान, चार सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच्या नावावर आठ गुण आहेत.
न्यूझीलंड आणि पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता किती?
पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी आपापले शेवटचे सामने कोणत्याही किंमतीत जिंकणे महत्त्वाचे आहे. यानंतर नेट रन रेट लागू होईल. या दोन्ही संघांना अफगाणिस्तानच्या पराभवासाठी प्रार्थनाही करावी लागणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला अजूनही संधी आहे. कारण इंग्लंडनंतर बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. येथील दोन विजयांमुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचे तिकीटही मिळेल. आता न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हरले किंवा त्यांचा नेट रनरेट सुधारला तरच पाकिस्तान पोहोचेल. न्यूझीलंडची अवस्थाही अशीच आहे, त्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या पराभवासाठी प्रार्थन करावी लागेल.