PAK vs NZ Champions Trophy Updates in Marathi: पाकिस्तान वि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिलाच सामना खेळवला जात आहे. या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडे दणक्यात पुनरागमन करत ३०० अधिक धावांचा टप्पा गाठला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सुरूवात चांगली करत झटपट तीन विकेट्स घेतले. पण न्यूझीलंडच्या मधल्या फळीने पाकिस्तानची झोप उडवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३२० धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीवीर विल यंग, टॉम लॅथम यांनी दणदणीत शतकं झळकावली. तर ग्लेन फिलिप्स वादळी अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या ३०० पार नेण्यात मदत केली. १५ षटकांत १०० धावाही न केलेल्या न्यूझीलंडने ५० षटतकं पूर्ण होईपर्यंत ३०० धावा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पाकिस्तानविरूद्ध दुसऱ्यांदा ३०० अधिक धावांचा टप्पा गाठला आहे.

न्यूझीलंड संघाला सामन्याच्या सुरूवातीलाच दोन धक्के बसले. तर पाकिस्तानचे गोलंदाजही किवी संघाला सहज धावा करू देत नव्हते. डेव्हॉन कॉन्वे १० धावा करत आठव्या षटकात तर केन विल्यमसन १ धाव करत नवव्या षटकात झेलबाद झाला. तर काही वेळातच डॅरिल मिशेलही झेलबाद झाला. अशारितीने न्यूझीलंडने ७३ धावांमध्येच ३ विकेट्स गमावले. किवी संघ २० षटकं झाली तरी १०० धावांचा टप्पा गाठू शकला नव्हता.

यानंतर विल यंग आणि टॉम लॅथम या दोघांनी संघाचा डाव उचलून धरला. विल यंगने ११३ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह १०७ धावांची खेळी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिलं शतक झळकावलं. तर टॉम लॅथम शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने १०४ चेंजूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ११८ धावांची वादळी खेळी केली. याशिवाय ग्लेन फिलिप्सने ३९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावा केल्या. टॉम लॅथमने ग्लेन फिलिप्स आणि विल यंगसह प्रत्येकी १०० धावांची भागीदारी रचली. यासह संघाने ५ षटकांत ३२० धावा केल्या.

पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर अबरार अहमदने १ विकेट घेत संघाला ब्रेकथ्रू मिळवत दिला. १० षटकांमध्ये हॅरिस रौफने सर्वाधिक ८३ धावा दिल्या.