न्यूझीलंड संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. फिन ऍलनच्या ६२ धावा आणि डेव्हॉन कॉनवेच्या नाबाद ४९ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानचे १३१ धावांचे लक्ष्य एक गडी आणि २३ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. टी२० तिरंगी मालिकेतील पाकिस्तानविरुद्ध किवींचा हा पहिला विजय आहे. तत्पूर्वी, फिरकीपटूंच्या शानदार गोलंदाजीमुळे यजमानांनी पाकिस्तानला १३० धावांवर रोखले होते, पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने सर्वाधिक २७ धावा केल्या तर न्यूझीलंडकडून सँटनर-साउथी आणि ब्रेसवेलने २-२ बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्राइस्टचर्च येथे खेळल्या जात असलेल्या तिरंगी मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ प्रथम खेळून केवळ १३० धावाच करू शकला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, स्टार सलामीवीर मोहम्मद रिझवान, गेल्या सामन्याचा हिरो शादाब खान, शान मसूद, हैदर अली आणि मोहम्मद नवाज असे सर्व स्टार खेळाडू सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून मिचेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी केली. ब्रेसवेलने चार षटकांत केवळ ११ धावा देत दोन बळी घेतले. त्याचबरोबर टीम साऊदी आणि मिचेल सँटनर यांनाही प्रत्येकी दोन यश मिळाले. ईश सोधीने एक गडी बाद केला.

हेही वाचा :  मोठी बातमी! बीसीसीआयला मिळणार नवीन अध्यक्ष! जय शाह मात्र सचिवपदी कायम 

बाबर आझम २३ चेंडूत २१, मोहम्मद रिझवान १७ चेंडूत १६, शान मसूद १२ चेंडूत १४ आणि शादाब खानने सात चेंडूत आठ धावा केल्या. त्याचवेळी हैदर अली ११ चेंडूत आठ आणि मोहम्मद नवाज खाते न उघडता तंबूत परतले. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तिरंगी मालिका खेळली जात आहे. ही मालिका तिन्ही देशांसाठी २०२२ टी२० विश्वचषकापूर्वी तयारी करण्याची उत्तम संधी आहे. या मालिकेत यापूर्वी पाकिस्तानने बांगलादेश आणि न्यूझीलंड संघाचा पराभव केला आहे. सरतेशेवटी, मालिकेतील अंतिम सामना सर्वोतम दोन  संघांमध्ये खेळवला जाईल.