ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट यांनी पत्रकारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात यजमान संघाच्या वेगवान गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना कसोटी सामन्यांमध्ये जास्त बळी घेता आलेले नाहीत. कराचीतील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळ संपला तेव्हा गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट यांना पत्रकारांनी विशेषत: वेगवान गोलंदाजांशी संबंधित प्रश्न विचारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा इंग्लंडने ३-० असा व्हाईटवॉश केला. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजांचाही महत्त्वाचा वाटा आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानी वेगवान गोलंदाज एका डावात पाच विकेट घेऊ शकले नाहीत.

पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नावर शॉन टेट भडकला

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज सपाट खेळपट्ट्यांवर विकेट घेण्यात अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत फक्त नसीम शाहने दोन कसोटी सामन्यात 9 बळी घेतले आहेत. इतर सर्व वेगवान गोलंदाजांना चार कसोटीत ९ बळी घेता आले. यावरून पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्यासाठी तळमळत असल्याचे दिसून येते. तर कराचीत न्यूझीलंडविरुद्ध खेळली गेलेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली.

हेही वाचा: Arshdeep Singh: ‘तु आंतरराष्ट्रीय क्रिकेट नको खेळू…’, नो बॉलवर गौतम गंभीर अर्शदीप सिंगवर संतापला

कराची कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एका पत्रकाराने गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट यांना पाच कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजांची खराब कामगिरी विचारली. तुम्ही त्याच्या कामगिरीचे समर्थन कसे करू शकता. हे तुमचे मत आहे, असे म्हणत शॉन टेटे यांनी पत्रकाराकडे नाराजी व्यक्त केली. यानंतर आणखी एका पत्रकाराने त्यांना हाच प्रश्न पुन्हा केला आणि म्हणाला, खराब कामगिरीवर केवळ पत्रकाराचेच नाही तर संपूर्ण देशाचे मत आहे.

पत्रकार पुढे म्हणाला, “मी तुम्हाला विचारतोय, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून तुम्ही संघाच्या कामगिरीवर खूश आहात का?” या प्रश्नाला उत्तर देताना शॉन टेट संतापला आणि म्हणाला, “तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर विचारण्यापूर्वी देत ​​आहात. हे तुमचे मत आहे असे तुम्ही म्हणत आहात. तुम्ही म्हणता की कामगिरी खराब झाली आहे. ठीक आहे हे तुमचे मत आहे.” पुढे तो आणखी भडकला आणि त्याने एकेरी शब्दात उल्लेख करत “तुला मला काय म्हणायचे आहे?, बाकीचे बोलण्यापेक्षा सामन्यावर बोल. सारखं काय तेच-तेच…गप्प बस जरा.” यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील या घटनेची दखल घेतली आहे. यावर आता काय कारवाई होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs nz now the bowling coach of the team is upset with the question of pakistani journalists know what he replied avw