Pakistan fielders celebrate wildly in front of Temba Bavuma after his dismissal in PAK vs SA : कराचीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रीट्झके, हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर साडेतीनशे धावांचा टप्पा पार केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानसमोर ५ गडी गमावून ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा धावबाद झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेम्बा बावुमाने ९६ चेंडूंचा सामना करताना १३ चौकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला धावबाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र, तो तंबूत परतण्यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्याला घेरले आणि त्याच्यासमोर जोरदार ओरडत आक्रमक सेलिब्रेशन करत डिवचण्याचा प्रयत्न केला. टेम्बा बावुमासमोर पाकिस्तानी खेळाडूंनी ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले ते चर्चेचा विषय बनले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी खेळाडूंच्या सेलिब्रेशनने वेधलं सर्वांच लक्ष –

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू टेम्बा बावुमासमोर विचित्र गोष्टी करत असल्याचे दिसून येते. या काळात पाकिस्तानी खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय, सोशल मीडिया चाहते पाकिस्तानी खेळाडूंच्या कृतींवर सतत टिप्पणी आणि टीका करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला दिले ३५३ धावांचे लक्ष्य –

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३५२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून यष्टिरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेनने ५६ चेंडूत सर्वाधिक ८७ धावा केल्या. मॅथ्यू ब्रॅट्झ्कीने ८४ चेंडूत ८३ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार टेम्बा बावुमा ९६ चेंडूत ८२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेच्या ३५२ धावांच्या प्रत्युत्तरात बातमी लिहिपर्यंत पाकिस्तानने ३३ षटकानंतर ३ बाग २१३ धावा केल्या आहेत. सध्या मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा पाकिस्तानकडून खेळत आहेत.