यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरी आज (९ सप्टेंबर) संपली असून येत्या ११ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होणार आहे. आज सुपर-४ फेरीतील शेवटचा सामनादेखील याच दोन संघांमध्ये खेळवला गेला. दरम्यान आजच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर १२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेने ही धावसंख्या पाच गडी राखून गठली. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झालेला असला तरी हसन अलीने दासून शनाकाचा टिपलेला झेल चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. शनाकाला बाद केल्यानंतर पाकिस्तानचे हसन आली आणि इफ्तिखार अहमद हे मैदानाच झेल टिपण्याचा सराव करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानपेक्षा श्रीलंका सरस! सुपर-४ फेरीतील शेवटच्या सामन्यात ५ गडी राखून मिळवला विजय

सामन्यात नेमकं काय घडलं?

सतराव्या षटकादरम्यान श्रीलंकेच्या दासून शनाका आणि पाथूम निसांका यांना रोखण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोहम्मद हसनैनकडे चेंडू सोपवला. त्यानेदेखील षटकाच्या दुसऱ्याच चेंडूत दासूनला झेलबाद केले. दासूनने हसनैनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत झेपावला. त्यानंतर हसन आली आणि इफ्तिखार अहमद असे दोघेही झेल टिपण्यासाठी धावले. हे दोघेही चेंडूकडे पाहात असल्यामुळे त्यांच्यात टक्कर होण्याची शक्यता होती. मात्र हसन अलीने चेंडू पकडल्यानंतर दोघेही मैदानावर पडले.

हेही वाचा >> Chess cheating drama : मॅग्नस कार्लसनने घेतली माघार, हॅन्स निमनवर गंभीर आरोप; जाणून घ्या बुद्धिबळात चिटिंग कसे केले जाते?

विशेष म्हणजे हा झेल टिपल्यानंतर हसन आली आणि इफ्तिखार अहमद हे दोघेही मैदानातच आनंदात एकमेकांकडे चेंडू फेकत होते. ते झेल टिपण्याचा सराव करत असावेत, असे दोघांकडे पाहून वाटत होते. दोघांचा हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> Anushka Sharma : विराटने शतक झळकावताच पत्नी अनुष्काची खास पोस्ट, पतीला उद्देशून म्हणाली “कोणत्याही…”

दरम्यान, आजचा हा सामना औपचारिकतेपुरताच खेळवला गेला. कारण याआधीच ११ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झालेले आहे. आज श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे ११ सप्टेंबर रोजीच्या सामन्यात कोण सरस ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs sl asia cup 2022 dasun shanaka out iftikhar ahmed hasan ali playing catch caught see video prd
Show comments