यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अंतिम लढत होत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा हा निर्णय योग्य ठरला. कारण १९ वर्षांचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने पाकिस्तानला पहिल्याच षटकात महत्त्वाचा बळी मिळवून दिला. विशेष म्हणजे नसीम शाहने टाकलेल्या चेंडूची तसेच त्याच्या कौशल्याची चांगलीच चर्चा होत आहे.
हेही वाचा >>> आशिया चषकातून भारत बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा काय करतोय? दुबईतील पंचतारांकित हॉटेलमधील फोटो आला समोर
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून अगोदर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाकडून पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस ही जोडी सलामीला आली. हे दोन्ही फलंदाज अनुभवी आणि आक्रमक असल्यामुळे श्रीलंकेचा संघ चांगली सुरुवात करेल अशी अपेक्षा होती. तर दुसरीकडे या दोघांना रोखण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पहिले षटक टाकण्यासाठी नसीम शाहकडे चेंडू सोपवला. शाहने षटकाचा तिसरा चेंडू उत्कृष्ट पद्धतीने फेकला. चेंडू अचानकपणे इनस्विंग झाल्यामुळे कुसल मेंडिस गोंधळला आणि त्याचा त्रिफळा उडाला. फक्त एक चेंडू खेळून त्याला शून्यावर बाद व्हावे लागले.
हेही वाचा >>> शतक झळकावून कोहलीने सही केली अन् बॅटची किंमत थेट लाखोंमध्ये गेली; पाकिस्तानी फॅन म्हणतो “१ कोटी रुपये…”
पाकिस्तान संघाचे प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, शादाब खान, आसिफ अली, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन
श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), दनुष्का गुनाथिलका, धनंजया डी सिल्वा, भानुका राजपक्षे, दासून शनाका (कर्णदार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, माहीश तिक्षाणा, दिलशान मधुशंका