PAK vs SL Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात येत्या ११ सप्टेंबर रोजी अंतिम लढत होणार आहे. या लढतीआधी ९ सप्टेंबर रोजी याच दोन्ही संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानी संघांचा कर्णधार बाबर आझमवर मी संघाचा कर्णधार आहे, असे सांगण्याची वेळ आली आहे. या प्रसंगाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>तब्बल ११ वर्षांनी एकत्र खेळणार ‘हे’ तीन दिग्गज खेळाडू, चौकार षटकारांचा पडणार पाऊस

पाकिस्तान-श्रीलंका सामन्यात नेमकं काय घडलं?

आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरीतील अखेरचा सामना श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात १६ व्या षटकात चांगलेच नाट्य रंगले. १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान याने जोरात अपील केले. हसन अलीने टाकलेला चेंडू निसांकाच्या बॅटला लागून गेल्याचा दावा त्याने केला. मात्र पंचाने निसांकाला नाबाद दिले. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या खेळाडूंकडे याबाबत चौकशी करण्यासाठी गेला. पुढे बाबरने डीआरएस घेण्यास सांगितले नसूनदेखील पंचाने थर्ड अंपायरला डीआरएसचा इशारा केला. याच वेळी बाबर आझम थोडा खवळला. मी कर्णधार आहे. मी डीआरएसमघ्या असे म्हणालोच नाही, असे बाबर पंचांना म्हणताना दिसला. त्याच्या देहबोलीतून त्याची नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा >>> ‘सध्याच्या खेळाडूंपेक्षा तू अधिक सरस,’ मारिया शारापोवाने टेनिसपटू सेरेना विल्यम्सला दिला होता विवृत्ती न घेण्याचा सल्ला

पुढे बाबर आझमने आपल्या अन्य खेळाडूंशी चर्चा करून अधिकृतपणे डीआरएस घेतला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मोठा गॅप असल्यामुळे निसांका नाबाद असल्याचे थर्ड अंपायरने जाहीर केले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा >>> PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानने सामना गमावला, पण खेळाडूंच्या करामतीची होतेय चर्चा; झेल टिपल्यानंतर मैदानातच…

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी १२२ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली. येत्या रवीवारी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी याच दोन संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार तसेच आशिया चषक स्पर्धेच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs sl asia cup 2022 pakistan captain babar azam upset on umpire over drs prd
Show comments