यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत येत्या ११ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होणार आहे. याआधी ६ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर-४ फेरीतील लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केले होते. याच कारणामुळे ११ सप्टेंबर रोजीच्या सामन्यात कोण बाजी मारणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच सामन्याबाबत भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने मोठे भाकीत केले आहे. त्याने या सामन्यात कोणत्या संघाचा विजय होणार हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र नाणेफेकीवर विजयाचे गणित असेल असे उथप्पाने म्हटले आहे.

हेही वाचा >> Video : ‘पाकिस्तानचा कर्णधार मी आहे,’ बाबर आझमवर आली पंचाला सांगण्याची वेळ; पाहा भर मैदानात नेमकं काय घडलं?

रॉबिन उथप्पाने एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील सामन्यावर भाष्य केले आहे. त्याने कोणता संघ बाजी मारेल याबाबत स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे उथप्पा म्हणाला. “सामन्यामध्ये नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. जो संघ टॉस जिंकेल त्याला खूप फायदा होईल,” असे उथप्पा म्हणाला.

हेही वाचा >> तब्बल ११ वर्षांनी एकत्र खेळणार ‘हे’ तीन दिग्गज खेळाडू, चौकार षटकारांचा पडणार पाऊस

सध्याची आशिया चषक स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेत ज्या संघांनी नाणेफेक जिंकलेली आहे, त्याच संघांचा बहुतांशवेळा विजय झालेला आहे. मागील वर्षीची टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएईमध्येच खेळवली गेली होती. तेव्हादेखील नाणेफेक जिंकलेल्या संघाला चांगला फायदा झाला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर संघाला वातावरण तसेच खेळपट्टी यांचा अभ्यास करून फलंदाजी तसेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेता येतो.

हेही वाचा >> PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानने सामना गमावला, पण खेळाडूंच्या करामतीची होतेय चर्चा; झेल टिपल्यानंतर मैदानातच…

दरम्यान, भारतीय संघासाठी आशिया चषक २०२२ स्पर्धा निराशाजनक राहिली. या स्पर्धेत भारताने साखळी सामन्यांत चांगली कामगिरी केली. मात्र सुपर-४ फेरीमध्ये भारतीय संघाला आपली कमाल दाखवता आली नाही. या फेरीमध्ये भारताचा श्रीलंका तसेच अफगाणिस्तान या संघाकडून पराभव झाला. याच कारणामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.