यूएईमध्ये सुरू असल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरीतील शेवटचा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी करत श्रीलंकेसमोर १२२ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेच्या पाथुम निसांका, भानुका राजपक्षे तसेच दासून शनाका यांनी संयमी फलंदाजी केली, ज्यामुळे श्रीलंकेला विजयापर्यंत पोहोचता आले. आता ११ सप्टेंबर रोजी याच दोन संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे.
हेही वाचा >>> Anushka Sharma : विराटने शतक झळकावताच पत्नी अनुष्काची खास पोस्ट, पतीला उद्देशून म्हणाली “कोणत्याही…”
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२२ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेचे आघाडीचे फलंदाज कुशल मेंडिस आणि दनुष्का गुनाथिलकाने खातं न खोलताच तंबुत परतले. पहिल्या फळीतील दोन फलंदाज शून्यावर बाद झाल्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंवर दाबाव वाढला होता. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेला धनंजया डी सिल्वा यानेदेखील निराशाच केली. तो अवघ्या ९ धावा करून झेलबाद झाला. पुढे भानुका राजपक्षे (२४) आणि पाथुम निसांका (५५ नाबाद) या जोडीने संयमी खेळ केला. ज्यामुळे श्रीलंकेला विजयाची गोडी चाखता आली.
हेही वाचा >>> Chess cheating drama : मॅग्नस कार्लसनने घेतली माघार, हॅन्स निमनवर गंभीर आरोप; जाणून घ्या बुद्धिबळात चिटिंग कसे केले जाते?
श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पाकिस्तानचे सलामीवर मोहम्मद रिझवान (१४) आणि बाबर आझम (३०) या जोडीने साधारण कामगिरी केली. फखर जमान (१३) इफ्तिखार अहमद (१३) हेदेखील आपली कमाल दाखवू शकले नाहीत. पुढे मोहम्मद नवाज ( २६) वगळता पाकिस्तानचा एकही खेळाडू पाचपेक्षा जास्त धावा करू शकला नाही. आसिफ अली, हसन अली शून्यावर बाद झाले.
हेही वाचा >>> Virat Kohli Century : तब्बल ३ वर्षांनी झळकावलं शतक, पण विराटला मात्र नवल नाही; म्हणतो “माझं पुढचं टार्गेट…”