PAK vs SL, World Cup 2023: विश्वचषकातील आठव्या सामन्यात पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने ५० षटकांत नऊ गडी बाद ३४४ धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी ३४५ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
पाकिस्तानला अवघड लक्ष्य मिळाले
पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. लंकन संघाने ५० षटकांत नऊ गडी गमावून ३४४ धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी ३४५ धावा कराव्या लागतील. त्यासाठी कुसल मेंडिन्सने सर्वाधिक १२२ धावा केल्या. त्याचे हे वन डेतील तिसरे शतक आहे. सदीरा समरविक्रमाने १०८ धावांची खेळी केली. त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या दोघांशिवाय पाथुम निसांकाने ५१ धावांचे योगदान दिले. धनंजय डी सिल्वाने २५ धावा, कर्णधार दासुन शनाकाने १२ धावा आणि दुनिथा वेललागेने १० धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अलीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हारिस रौफला दोन यश मिळाले. शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लंकेकडून सलामीला पथुम निसांका आणि कुसल परेरा उतरले होते. मात्र, डावाच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हसन अली याने परेराला बाद केले. त्यानंतर कुसल मेंडिस व पाथुम निसंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. निसंका अर्धशतक करून बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर सदिरा समरविक्रमा हा फलंदाजीला आला. या जोडीने पुन्हा एकदा शतकी भागीदारी करून श्रीलंकेला सामन्यात पुढे नेले.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात त्यांचा स्टार फिरकीपटू महिष तिक्षिना परतला आहे. यामुळे श्रीलंकेचा संघ मजबूत झाला आहे. पाकिस्तान संघातही एक बदल करण्यात आला आहे. फखर जमानच्या जागी अब्दुल्ला शफीकचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघातील ११ खेळत आहे
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालगे, महेश तिक्षणा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.