PAK VS SL Viral Video: सायबर गुन्हे, रहदारीचे नियम आणि अनेक विषयांवर जागरुकता पसरवण्यासाठी अलीकडे पोलिसही मीम्सचा आधार घेतात. आशिया चषक अंतिम सामन्यानंतर दिल्ली पोलिसांनी असेच एक मीम ट्विट करून वाहतुकीच्या सुरक्षेच्या बाबतीत भाष्य केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हिडीओ वापरल्याने हे हटके मीम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.

झालं असं की, तुम्ही ट्वीटमध्ये पाहू शकता की आसिफ अली आणि शादाब खान यांनी कालच्या सामन्यात एकमेकांना आदळून एक महत्त्वाची विकेट सोडली होती. दोन्ही क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचे लक्ष चेंडूवर होते. मात्र, ते एकमेकांना भिडल्याने कोणालाच झेल घेता आला नाही. उलट यांचा हात लागल्याने चेंडू थेट सीमा रेषेच्या पार गेला व श्रीलंकेला सहा धावा मिळाल्या. शादाब खानने आशिया चषक विजयी श्रीलंकेच्या संघाविरुद्ध अनेक झेल सोडले ज्यामुळे पाकिस्तानने शेवटच्या पाच षटकांमध्येही श्रीलंकेला बऱ्याच धावा दिल्या.

हा व्हिडीओ पोस्ट करून त्यावर ‘ए भाई, जरा देख के चलो’ हे गाणे लावून दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर चालतानाही नेहमी लक्ष ठेवून चाला असा सल्ला दिला आहे. दिल्ली पोलिसांचा हा हटके अंदाज नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरत आहे.

PAK VS SL नंतर वसीम अक्रम यांच्यावर ट्रोलर्सचा हल्ला; कोहलीचा विक्रम मोडणाऱ्या ‘या’ खेळाडूला म्हणाले..

दिल्ली पोलिसांचा हटके अंदाज

वाहतूक पोलिसांनी यापूर्वी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक मार्ग वापरले आहेत. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातानंतर, दिल्ली पोलिस विभागाने देखील कार चालवताना किंवा बसताना सीटबेल्ट घालण्याच्या महत्त्वाबद्दल नागरिकांना शिक्षित करण्यासाठी ट्विटरवर एक मोहीम सुरू केली आहे याचा भाग म्हणून अशा पद्धतीचे ट्वीट केले जात आहेत.

Story img Loader