PAK vs WI 1st Test Babar Azam wasted DRS after Wicket : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मुलतान येथे खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी ठरताना दिसत आहे. कारण संघाने ४६ धावांवर आपली चौथी विकेट्स गमावली आहे. त्यांचा स्टार फलंदाज बाबर आझम स्वस्तात बाद झाला. दरम्यान त्याने डीआरएस पण गमावला, ज्यामुळे चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाहते बाबर आझमवर संतापले –

पाकिस्तानला चौथा धक्का बाबर आझमच्या रूपाने बसला, जो २० चेंडूत आठ धावा काढून जेडेन सील्सचा बळी ठरला. वास्तविक, सील्सचा चेंडू बाबरच्या बॅटच्या बाहेरील कडा घेऊन यष्टिरक्षक टेविन इम्लाचच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. त्यामुळे बाबरला आऊट देण्यात आले, पण त्याने अंपायर्सच्या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये चेंडूने बाबरच्या बॅटची कडा घेतल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले. यावरून चाहते बाबरला आता प्रचंड ट्रोल करत आहेत.

चाहत्यांचे मत आहे की, बाबर आझमने अशा प्रकारे संघाचा डीआरएस वाया घालवायला नको होता. मात्र, बाबर बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी मिळून पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. कर्णधार शान मसूदबद्दल बोलायचे तर तो ११ धावा करून बाद झाला, तर मोहम्मद हुरैरा केवळ ६ धावा करून बाद झाला. कामरान गुलामलाही केवळ पाच धावांचे योगदान देता आले. पहिल्या चारपैकी तीन विकेट्स जेडेन सील्सने घेतल्या. वृत्तलिहिपर्यंत पाकिस्तानने ४१ षटकानंतर ४ बाद १४१ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान ५० आणि सौद शकील ५५ धावांवर खेळत आहेत.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माची तुफान फटकेबाजी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नेटमध्ये सराव करतानाचा VIDEO केला शेअर

धुक्यामुळे मुलतान कसोटी उशिरा सुरू झाली –

तत्पूर्वी मुलतान कसोटी सामना सकाळीच सुरू होणार होता. मात्र, दाट धुक्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. धुके ओसरल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी आले. शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुलतानबद्दल असे मानले जाते की येथील खेळपट्टी सपाट आहे. त्यामुळे फलंदाजांना धावा करण्यास मदत होते. यापूर्वी येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी झाली तेव्हा हॅरी ब्रूकने त्रिशतक झळकावले होते, तर जो रूटने द्विशतक झळकावले होते. कदाचित आपण प्रथम मोठी धावसंख्या करू या विचाराने शानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs wi babar azam waisted drs after getting caught behind fans got furious at multan test match vbm