Emerging Asia Cup 2024: इमर्जिंग एशिया कप २०२४ चे आयोजन यंदा ओमानमध्ये केले जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानसह अनेक आशियाई देश सहभागी होणार आहेत. भारत अ व्यतिरिक्त पाकिस्ताननेही संघ जाहीर केला आहे. मोहम्मद हारिस या स्पर्धेत पाकिस्तान अ संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र सध्या चर्चेत असलेली ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याने एक मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानी कर्णधाराचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानच्या अ संघाचा कर्णधार मोहम्मद हरिसने स्पर्धेपूर्वी एक मोठा खुलासा केला आहे. इमर्जिंग आशिया कप २०२४ साठी त्याच्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास बंदी असल्याचे त्याने म्हटले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हरिस म्हणतो की आमच्या ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्याने कबूल केले की जेव्हा आमच्या ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल चर्चा होते तेव्हा त्यांच्या खेळाडूंवर जास्त दबाव जाणवतो.

हेही वाचा – IND vs NZ कसोटी मुंबईतील वानखेडेमध्ये होणार, रेल्वे तिकिटापेक्षाही मॅचची तिकिटे स्वस्त; कधीपासून सुरू होणार ऑनलाईन बुकिंग?

१९ ऑक्टोबरला पाकिस्तान वि भारत यांच्यात टूर्नामेंटमधील पहिला सामना होणार आहे. भारत पाकिस्तानच्या गटात ओमान आणि युएई हे दोन संघ आहेत. भारत-पाकिस्तानशिवाय या स्पर्धेत इतर आशियाई संघही आहेत.

हारिस या व्हायरल व्हीडिओमध्ये म्हणातोय की, “मी तुम्हाला एक सांगू का, पहिल्यांदाच असं होईल की आमच्या ड्रेसिंग रूममध्ये भारताविषयी चर्चा करण्यावर बंदी घाचली आहे.” २३ वर्षींय मोहम्मद हारिस हा पाकिस्तानच्या सिनियर संघातूनही खेळला आहे. त्याने पाकिस्तानसाठी ६ वनडे सामने आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत.

हेही वाचा – Bangladesh Coach: बांगलादेशी खेळाडूच्या श्रीमुखात लगावल्याने संघाच्या कोचची पदावरून हकालपट्टी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

हारिस भारताविषयी प्रश्न विचारल्यावर म्हणाला, “आम्हाला फक्त भारताचा विचार करायचा नाहीय तर आम्हाला इतर संघांविषयी देखील विचार करावा लागतो. मी पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात होतो, गेल्या विश्वचषकातही मी खेळलो. यामुळे इतका दबाव निर्माण होतो की तुम्ही मानसिकदृष्ट्या फक्त भारताचाच विचार करता. आम्हाला इतर संघांचाही सामना करावा लागेल. त्यामुळे सध्या ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास बंदी आहे.आम्ही ड्रेसिंग रूममध्ये आता भारताविषयी बोलतच नाही. फक्त भारतचं नाही आम्हाला इतरही संघांचा विचार करावा लागेल.”

हेही वाचा – Mithali Raj: “हरमनप्रीतच्या जागी नवा कर्णधार नेमण्याची योग्य वेळ…”, मिताली राजचे भारताच्या वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर मोठं वक्तव्य; दोन नव्या कर्णधारांची नावंही सुचवली

भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी तिलक वर्माच्या खांद्यावर

इमर्जिंग आशिया कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहे. त्याच्याशिवाय अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंनी आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. गेल्या वेळी यश धुलने इमर्जिंग आशिया कपमध्ये भारताची कमान सांभाळली होती. मात्र, अंतिम फेरीत भारताचा पराभव करत पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते.

इमर्जिंग आशिया कपसाठी भारताचा संघ

तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), प्रभसिमरन सिंग, आयुष बदोनी, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, रसिक सलाम, अनुज रावत, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, साई किशोर, राहुल चहर आणि आकिब खान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan a cricket team captain mohammed haris sensational revelation said banned from talking about india emerging asia cup ind vs pak bdg