Pakistan and Afghanistan Fans Clash in Match: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही देशांचे चाहते आपपसात भिडले असून वाद घालताना दिसत आहेत. या सामन्यात पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या श्रीलंकन ​​खेळाडूंसोबत अफगाणिस्तानचे चाहतेही भिडल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे चाहते वाद घालताना दिसत आहेत.

याआधीही क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे चाहते भिडले आहेत. २०२२ आशिया चषक स्पर्धेत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सामन्यात बराच गदारोळ झाला होता. दोन्ही देशांच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये खुर्च्या फेकल्या आणि एकमेकांना मारले होते. यामागील कारण दोन्ही देशांचे खेळाडू मैदानात भिडले होते. यावेळी मैदानात सर्व काही सामान्य होते, परंतु स्टेडियममध्ये दोन चाहत्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि आजूबाजूचे लोक ते शांत करण्यासाठी आले आणि त्याच्यातच वाद झाला. सुदैवाने स्टेडियममध्ये हिंसाचार झाला नाही. मात्र, दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

india new zealand second test cricket match from today
भारताचे मालिकेत बरोबरीचे लक्ष्य; न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून; खेळपट्टीचे स्वरूप गुलदस्त्यात
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO
Loksatta explained Where exactly did the Indian women team go wrong How affected by the failure of Smriti Mandhana
जेतेपदाचे ध्येय, पण साखळीतच गारद! भारतीय महिला संघाचे नेमके चुकले कुठे? स्मृती मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?
Babar Azam, Pakistan batsman Babar Azam,
विश्लेषण : एके काळी सर्वोत्तम, आता गच्छंती… पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमवर अशी वेळ का आली?
IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कोचच्या पाकिस्तानला शुभेच्छा, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना
Pakistan Drop Babar Azam Shahen Shah Afridi and Naseem Shah For Last Two Tests Against England PAK vs ENG Test
PAK vs ENG: बाबर आझमची इंग्लंडविरूद्धच्या कसोटी संघातून हकालपट्टी, बाबरसह अनेक स्टार खेळाडूंना दिला डच्चू, कसा आहे नवा संघ?
Babar Azam Set To Be Dropped From Pakistan Playing 11 For 2nd Test Against England PAK vs ENG
Babar Azam: बाबर आझम पाकिस्तानच्या कसोटी संघातून होणार बाहेर, इंग्लंडविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात मोठा निर्णय

हेही वाचा: World Athletics: नीरज चोप्रा आज इतिहास रचणार? ‘गोल्डन बॉय’ची मॅच कधी आणि कुठे बघायला मिळणार? जाणून घ्या

काय घडलं मॅचमध्ये?

पाकिस्तानने तीन एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानचा ३-० असा पराभव करत सुपडा साफ केला. शनिवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या तिसऱ्या सामन्यात ५९ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेतील हंबनटोटा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ५० षटकांत आठ विकेट्स गमावत २६८ धावा केल्या.

प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ४८.४ षटकांत २०९ धावांवर गारद झाला. अफगाणिस्तानसाठी आघाडीच्या फळीतील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात फिरकीपटू मुजीब उर रहमानने ३७ चेंडूत ६४ धावा करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि पाच षटकार मारले, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शाहिदुल्ला कमालने ३७ आणि रियाझ हसनने ३४ धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने तीन विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आघा सलमानला ब्रेकथ्रू मिळाला होता.

हेही वाचा: Asia Cup 2023: लष्करापासून ते पाकिस्तानी रेंजर्सपर्यंत कशी असेल आशिया कप २०२३ची सुरक्षा व्यवस्था? जाणून घ्या

बाबर आणि रिझवानने अर्धशतकं ठोकली

याआधी पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतकी खेळी खेळली. रिझवानने ६७ आणि बाबरने ६० धावा केल्या. आघा सलमानने ३८ आणि मोहम्मद नवाजने ३० धावा केल्या. फखर जमान २७, इमाम-उल-हक १३, सौद शकील नऊ, शादाब खान तीन आणि फहीम अश्रफ दोन धावा करून बाद झाले. शाहीन आफ्रिदीने नाबाद दोन धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि फरीद अहमद मलिक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.