Pakistan and Afghanistan Fans Clash in Match: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही देशांचे चाहते आपपसात भिडले असून वाद घालताना दिसत आहेत. या सामन्यात पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या श्रीलंकन खेळाडूंसोबत अफगाणिस्तानचे चाहतेही भिडल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे चाहते वाद घालताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याआधीही क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे चाहते भिडले आहेत. २०२२ आशिया चषक स्पर्धेत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सामन्यात बराच गदारोळ झाला होता. दोन्ही देशांच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये खुर्च्या फेकल्या आणि एकमेकांना मारले होते. यामागील कारण दोन्ही देशांचे खेळाडू मैदानात भिडले होते. यावेळी मैदानात सर्व काही सामान्य होते, परंतु स्टेडियममध्ये दोन चाहत्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि आजूबाजूचे लोक ते शांत करण्यासाठी आले आणि त्याच्यातच वाद झाला. सुदैवाने स्टेडियममध्ये हिंसाचार झाला नाही. मात्र, दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
काय घडलं मॅचमध्ये?
पाकिस्तानने तीन एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानचा ३-० असा पराभव करत सुपडा साफ केला. शनिवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या तिसऱ्या सामन्यात ५९ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेतील हंबनटोटा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ५० षटकांत आठ विकेट्स गमावत २६८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ४८.४ षटकांत २०९ धावांवर गारद झाला. अफगाणिस्तानसाठी आघाडीच्या फळीतील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात फिरकीपटू मुजीब उर रहमानने ३७ चेंडूत ६४ धावा करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि पाच षटकार मारले, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शाहिदुल्ला कमालने ३७ आणि रियाझ हसनने ३४ धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने तीन विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आघा सलमानला ब्रेकथ्रू मिळाला होता.
बाबर आणि रिझवानने अर्धशतकं ठोकली
याआधी पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतकी खेळी खेळली. रिझवानने ६७ आणि बाबरने ६० धावा केल्या. आघा सलमानने ३८ आणि मोहम्मद नवाजने ३० धावा केल्या. फखर जमान २७, इमाम-उल-हक १३, सौद शकील नऊ, शादाब खान तीन आणि फहीम अश्रफ दोन धावा करून बाद झाले. शाहीन आफ्रिदीने नाबाद दोन धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि फरीद अहमद मलिक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.