पाकिस्तानच्या देशांतर्गत कायद-ए-आझम ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजी करताना छातीत दुखू लागल्याने फलंदाज आबिद अलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार आबिद अलीची प्रकृती स्थिर आहे. तो कराचीत सामना खेळत होता. रुग्णालयात नेल्यानंतर त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आबिद अलीची ईसीजी आणि इको चाचणी झाली आहे. आबिदला ‘अ‍ॅक्युट कोरोनरी सिंड्रोम’ झाल्याचे निदान झाले. खैबर पख्तुनख्वा संघाविरुद्ध खेळत असलेल्या आबिदने दोनदा छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याच्या संघाचे व्यवस्थापक अश्रफ अली यांनी त्याला रुग्णालयात दाखल करून त्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

आबिद अली कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये मध्य पंजाबकडून खेळत आहे. पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आबिद अलीचा खेळ सातत्याने चांगला राहिला आहे. खैबर पख्तूनख्वा आणि मध्य पंजाब यांच्यातील सामना यूबीएल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळला जात होता. पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आबिद अलीची प्रकृती स्थिर असून त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाईल. पाकिस्तानच्या डोमेस्टिक सर्किटमध्ये आबिद अलीने चांगली फलंदाजी करताना अनेक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ६००० धावा आहेत. तो पाकिस्तानी संघाकडूनही खेळतो.

हेही वाचा – ग्लॅमरसच..! सचिनची लाडकी लेक गोव्यात करतेय मजा; PHOTO पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके!

३४ वर्षीय आबिदला रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर वयाच्या ३१ व्या वर्षी तो पाकिस्तानकडून खेळू लागला. याआधी तो केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळाली.

‘अ‍ॅक्युट कोरोनरी सिंड्रोम’ म्हणजे काय?

‘अ‍ॅक्युट कोरोनरी सिंड्रोम’मध्ये हृदयाला रक्तपुरवठा अचानक कमी होतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एका निवेदनात म्हटले आहे, “त्याला (आबिद) ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला ‘अ‍ॅक्युट कोरोनरी सिंड्रोम’ असल्याचे निदान झाले. पुढील उपचारांसाठी पीसीबीच्या वैद्यकीय पथकाच्या संपर्कात असलेल्या हृदयरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. यावेळी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा ही विनंती.”

Story img Loader