दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यानच्या सुपर फोर फेरीमधील सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. पाकिस्तानने हा सामना पाच गडी राखून जिंकला. या पराभवामुळे भारत या स्पर्धेमधून बाहेर पडला का यासंदर्भातील चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. भारताचा हा या स्पर्धेमधील पहिलाच पराभव आहे. मात्र या एका पराभवामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला का हे जाणून घेऊयात.
नक्की पाहा >> Video: पाकविरुद्धच्या सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या पंत, पंड्यावर कर्णधार रोहित भडकला; ड्रेसिंग रुममध्ये दोघांना झापलं
सुपर फोरचे सामने शनिवारपासून सुरु झाले आहेत. सुपर फोरमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानबरोबरच श्रीलंकेचा संघ आहे. भारत हा पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरोधात आणि दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगविरोधात जिंकल्याने साखळी फेरीमध्ये अ गटात अव्वल स्थान मिळवलं. याच गटामध्ये पाकिस्तान दुसऱ्या स्थानी होता. दुसरीकडे ब गटामध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने अंतिम चारमध्ये स्थान मिळालं.
सुपर फोरमधील पहिला सामना शनिवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये झाला. हा सामना श्रीलंकेने चार गडी राखून जिंकला. सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. मात्र सुपर फोरमध्ये सामने हे राऊण्ड-रॉबीन पद्धतीने खेळवले जात आहेत. म्हणजेच या फेरीमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघांविरोधात प्रत्येकी एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. या फेरीमध्ये अव्वल स्थानी राहणाऱ्या चारपैकी दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. अंतिम सामना हा ११ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.
नक्की पाहा >> IND vs PAK Asia Cup: नाद करा पण विराटचा कुठं! खणखणीत षटकार लगावत साजरं केलं अर्धशतकं; Video झाला Viral
त्यामुळेच पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे. भारताचा पुढील सामना मंगळवारी सहा तारखेला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तर सुपर फोरमधील भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध आठ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार श्रीलंका आणि पाकिस्तान हे प्रत्येकी एक सामना जिंकून या चार संघांमध्ये अव्वल स्थानी आहेत. तर तळाच्या दोन स्थानी भारत आणि अफगाणिस्तानचा संघ आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या सर्व तपशील
सुपर फोरमधील सामने कसे आहेत हे पाहूयात…
खेळून झालेले सामने
पहिला सामना- शनिवार, ३ सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – श्रीलंकेने सामाना चार गडी राखून जिंकला
दुसरा सामना – रविवार, ४ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – पाकिस्तानने सामना पाच गडी राखून जिंकला
शिल्लक सामने
तिसरा सामना- मंगळवार, ६ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध भारत, दुबईच्या मैदानावर खेळवला जाणार
चौथा सामना- बुधवार, ७ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, शारजहाच्या मैदानावर खेळवला जाणार
पाचवा सामना- गुरुवार, ८ सप्टेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दुबईच्या मैदानावर खेळवला जाणार
सहावा सामना- शुक्रवार, ९ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, दुबईच्या मैदानावर खेळवला जाणार
अंतिम सामना- रविवार ११ सप्टेंबर – सुपर फोरमधील दोन अव्वल संघांमध्ये दुबईच्या मैदानावर खेळवला जाणार
कुठे पाहता येणार सामने?
आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. भारताचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता यतील. डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि अगदी स्मार्ट टीव्हीवरही डिस्ने-हॉटस्टार अॅपच्या माध्यमातून हा सामना पाहता येईल.
सामन्याची वेळ?
हे सामने संयुक्त अरब अमिरातीमधील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता खेळवण्यात येत आहेत.. भारतामध्ये हे सामने सायंकाळी साडेसात वाजल्यापासून प्रेक्षकांना पाहता येतात. सात वाजता नाणेफेक होते.