PAK vs WI 1St Test Highlights in Marathi: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना मुल्तानमध्ये खेळवला गेला, या कसोटीचा निकाल अवघ्या २ दिवसांतच लागला आहे. पाकिस्तानने मुलतान कसोटी १२७ धावांनी जिंकत आपली मायदेशातील कसोटी सामन्यातील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. इंग्लंड मालिकेप्रमाणे या सामन्यातही पाकिस्तानी फिरकी गोलंदाजांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. साजिद खान आणि नोमान अली या पाकिस्तानी गोलंदाजी जोडीने वेस्ट इंडिज संघाला फार काळ मैदानावर टिकू दिले नाही.

पाकिस्तानने या सामन्यात वेस्ट इंडिजचा १२७ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह पाकिस्तान संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तान संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२३-२५ या चक्रातील शेवटची मालिका खेळत आहे.

हेही वाचा – INDW vs WIW: भारताच्या लेकींची टी-२० वर्ल्डकपमध्ये दणक्यात सुरूवात, २६ चेंडूतच जिंकला पहिला सामना; वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा

पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना त्यांचा संघ पहिल्या डावात २३० धावांत सर्वबाद झाला. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आणि त्यांचा संघ पहिल्या डावात केवळ १३७ धावांवर ऑलआऊट झाला. यादरम्यान पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पाकिस्तानकडून नोमान अलीने ५, साजिद खानने ४ आणि अबरार अहमदने एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ

यासह दुसऱ्या डावात पाकिस्तान संघाकडे ९३ धावांची आघाडी होती. पाकिस्तानने दुसऱ्या डावात १५७ धावा केल्या आणि त्यांचा संघ सर्वबाद झाला. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानने वेस्ट इंडिजला २५१ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य खूपच कमी वाटत होते, पण खेळपट्टीची स्थिती पाहता हे लक्ष्य वेस्ट इंडिजसाठी खूप कठीण झाले. वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १२३ धावांत ऑलआऊट झाला आणि पाकिस्तानने सामना जिंकला.

हेही वाचा – Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियममध्ये शाहरूख खानवर का घातली होती ५ वर्षांची बंदी? किंग खानने कोणाला केली होती शिवीगाळ?

फिरकीपटूंचा संपूर्ण पाकिस्तान-वेस्ट इंडिज सामन्यात दबदबा

संपूर्ण सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी २० पैकी १४ विकेट घेतल्या, तर त्यांचे वेगवान गोलंदाज केवळ ३ विकेट घेऊ शकले. दुसरीकडे, पाकिस्तानच्या सर्व २० विकेट त्याच्या फिरकी गोलंदाजांच्या नावावर होत्या. इंग्लंड मालिकेचा नायक साजिद खानने सामन्याच्या पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट घेत एकूण ९ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

फिरकीपटू नोमान अलीने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात १ विकेट घेतली. उर्वरित ५ विकेट अबरार अहमदच्या नावावर होत्या. एवढेच नाही तर पाकिस्तानी संघाने जवळपास ५८ षटकं टाकली, मात्र केवळ १ षटकच वेगवान गोलंदाजाने टाकली. साजिद खानला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Story img Loader