India vs Australia ICC World Cup Final 2023: पाकिस्तान क्रिकेट सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. विश्वचषकात संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर प्रशिक्षकापासून कर्णधारापर्यंत सगळेच बदलले आहेत. यात नवीन वेगवान आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. माजी खेळाडू उमर गुल आणि सईद अजमल यांच्यावर पीसीबीने मोठी जबाबदारी दिली आहे. गुलला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि अजमलला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. अलीकडेच शान मसूदला कसोटी कर्णधार आणि शाहीन आफ्रिदीला टी-२० कर्णधार बनवण्यात आले. माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीज क्रिकेट संचालक आणि वहाब रियाझ मुख्य निवडकर्ता बनवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमर गुल आणि सईद अजमल हे २००९ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचे सदस्य आहेत. गुल दक्षिण आफ्रिकेच्या मोर्ने मॉर्केलच्या जागी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. तो अजमलसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी संघाबरोबर काम करण्यास सुरुवात करेन. पाकिस्तानला १४ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियात तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर त्यांना १२ ते २१ जानेवारी दरम्यान न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी२० मालिकेत सहभागी व्हायचे आहे.

हेही वाचा: IND vs AUS: भारतात झालेल्या विश्वचषकाने रचला इतिहास!आयसीसीची सर्वाधिक पाहिली जाणारी ठरली स्पर्धा, २०१५चा मोडला विक्रम

उमर गुलने शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला होता

याआधी उमर गुलने पाकिस्तान संघात काम केले होते. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान तो संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. गुल पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. याशिवाय २०२२च्या टी-२० विश्वचषकादरम्यान तो अफगाणिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. गुलने २००३ मध्ये पाकिस्तानसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने ४७ कसोटी, १३० एकदिवसीय आणि ६० टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला. गुलने कसोटीत १६३, वन डेत १७९ आणि टी-२० मध्ये ८५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला होता.

हेही वाचा: IND vs AUS Final: रोहित शर्माच्या निर्णयावर गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “सूर्यकुमारवर विश्वास नव्हता तर संघात…”

पाकिस्तानकडून अजमलने ४४७ विकेट्स घेतल्या

सईद अजमलबद्दल जर बोलायचे झाले तर तो वन डेमध्ये नंबर वन गोलंदाज ठरला आहे. २००८ मध्ये त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. अजमलने पाकिस्तानकडून ३५ कसोटी, ११३ एकदिवसीय आणि ६४ टी-२० सामन्यांमध्ये एकूण ४४७ विकेट्स घेतल्या. पीएसएलमध्ये तो इस्लामाबाद युनायटेडचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan before australia tour umar gul became pakistans fast bowling coach saeed ajmal got this responsibility avw