भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीमध्ये भारताने आशिया चषक २०२३ बद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बैठकीत बीसीसीआयने स्पष्ट केले की, भारतीय संघ आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झालं आहे. त्यानंतर आता अशी बातमी समोर आली आहे की, पाकिस्तानचा संघ यंदा भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी न होण्याचा विचार करत आहे.
बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज आहे. बीसीसीआयने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बीसीसीआयने म्हटलं आहे की, एखाद्या तटस्थ ठिकाणी आशिया चषक स्पर्धेचं आयोजन केलं तरच भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होईल, असं वृत आज तकने प्रसिद्ध केलं आहे. बीसीसीआयने सांगितलं की, विराट कोहली, रोहित शर्मासारखे स्टार खेळाडू सहभागी झाले नाहीत तर प्रायोजक माघार घेतात.
रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, आशिया चषक २०२३ ही स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवली तर पाकिस्तान यंदा भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही. भारताच्या विरोधानंतर पाकिस्तान आता आशिया चषक स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याचा विचार करत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं की, टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयने हा निर्णय भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून घेतला आहे.
हे ही वाचा >> विराट कोहली vs रोहित शर्मा वादामुळे संघात फूट पडताच रवी शास्त्री यांनी थेट.. माजी प्रशिक्षकांचा मोठा खुलासा
भारत-पाकिस्तान सामने केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध अलिकडच्या काळात फारसे चांगले राहिलेले नाहीत. दोन्ही देशांचे क्रिकेट संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरोधात खेळतात. २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत उभय संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. हा सामना भारताने जिंकला होता. विराट कोहलीने या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करून सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.