Pakistan Unwanted Record After PAK vs BAN Test Defeat: नझमुल हुसेनच्या नेतृत्वाखाली बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर संघाचा दारूण पराभव केला आहे. पाकिस्तानमधील कसोटी मालिकेत त्यांनी पाकिस्तानचा पराभव करत इतिहास घडवला आहे. बांगलादेशने २ सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली आणि पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. बांगलादेशने पहिली कसोटी १० गडी राखून आणि दुसरी कसोटी ६ गडी राखून जिंकली. ही मालिका गमावलीच पण पाकिस्तानने एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.

हेही वाचा – Bangladesh beat Pakistan by 6 Wickets: पाकिस्तान चारीमुंड्या चीतपट; बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

पाकिस्तानच्या नावावर नकोसा विक्रम

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​मध्ये पाकिस्तानशिवाय कोणत्याच संघाने आपल्याच भूमीवर अशी कामगिरी केली नसेल. पाकिस्तानने घरच्या मालिकेत गेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये एकही विजय नोंदवला नाही. अशाप्रकारे पाकिस्तानने बांगलादेश आणि झिम्बाब्वेसह एका नको त्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वे हे दोनच संघ त्यांच्या घरच्या मैदानावर १० कसोटी सामन्यांमध्ये एकही विजय नोंदवू शकले नाहीत, आता पाकिस्तानही या क्लबमध्ये सामील झाला आहे.

हेही वाचा – Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

पाकिस्तान हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुन्या कसोटी खेळणाऱ्या १० संघांपैकी प्रत्येक संघाविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी हरणारा दुसरा संघ बनला आहे, याआधी या क्लबमधील एकमेव संघ बांगलादेश होता. या क्लबमध्ये बांगलादेशने पाकिस्तानचाही समावेश केला आहे. पाकिस्तानने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे आयोजन केले होते आणि दोन्ही सामने गमावले. बांगलादेशने क्लीन स्वीप करत मालिका जिंकली.

हेही वाचा – WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल

पाकिस्तान क्रिकेटचा वाईट काळ

क्रिकेटच्या इतिहासातील हा पाकिस्तानचा सर्वात वाईट काळ असल्याचेही म्हटले जात आहे. पाकिस्तान २०२३ विश्वचषकाच्या गट टप्प्यातून बाहेर पडला, त्यानंतर टी-२० विश्वचषक २०२४ च्या गट टप्प्यातील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही आणि आता बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. ही मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदही खूप निराश दिसत होता. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान मजबूत स्थितीत होता, पण बांगलादेशने उत्कृष्ट कामगिरी करत दमदार पुनरागमन केले.

हेही वाचा – PAK vs BAN: “असं ४ वेळा झालंय…” पाकिस्तानच्या कर्णधाराने कोणावर फोडले लाजिरवाण्या पराभवाचे खापर? पाहा नेमकं काय म्हणाला?

मालिका गमावल्यानंतर शान मसूद म्हणाला, ‘मी खूप निराश आहे, कारण आम्ही घरच्या सीझनसाठी खूप उत्सुक होतो. इथेही ऑस्ट्रेलियासारखीच स्थिती आहे, आम्ही आमच्या चुकांमधून धडा घेतला नाही. आम्हाला वाटले की आम्ही ऑस्ट्रेलियात चांगले खेळलो, पण जिंकू शकलो नाही. यावर आम्हाला काम करावे लागेल. माझ्या कर्णधारपदाखाली चार वेळा असे घडले आहे, जेव्हा आम्ही मजबूत स्थितीत होतो आणि विरोधी संघाला पुनरागमनाची संधी दिली.

Story img Loader