Pakistan Cricket Board Latest Update : मागील काही महिन्यांपासून टीम इंडियाला एशिया कपसाठी पाकिस्तानमध्ये जाण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ उडाली आहे. पीसीबीने एशिया कपसाठी भारतापुढं काही विकल्प ठेवले आहेत. पण आता एशियन क्रिकेट काऊंसिलने नुकत्याचा घेतलेल्या एका निर्णयामुळं पाकिस्तानसमोर मोठा सवाल उपस्थित झाला आहे. पीसीबीने ठेवलेला हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव एसीसीने नाकारला आहे. या निर्णयानंतर आता पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की, पाकिस्तान टीम एशिया कपमध्ये सहभागी होणार नाही.
भारत पाकिस्तानात एशिया कप खेळायला जाणार नाही, असा सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने याबाबत माहती दिली होती. त्यानंतर पीसीबी चेअरमन नजम सेठीने हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी सेठी म्हणाला, भारताला सोडून पाकिस्तान आणि इतर टीम त्यांचे सामने नियोजित ठिकाणावर खेळतील. त्यामुले पाकिस्तान बोर्डाने युएईमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, श्रीलंका आणि बांगलादेशने हा प्रस्ताव अमान्य केला होता.
या बोर्डांनी हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव अमान्य करण्याचं कारण की, विश्वकपच्या आधी त्यांच्या खेळाडूंना दुखापत होण्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा धोका पत्करता येणार नाही. अशा परिस्थितीत टूर्नामेंट पूर्णपणे श्रीलंकेत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु, पाकिस्तानकडून याला विरोधा दर्शवण्यात येत आहे. तिकिटांच्या कमाईचा काही हिस्सा मिळावा, अशी मागणी श्रीलंकेचा क्रिकेट बोर्ड करत आहे. मात्र, पीसीबीचा या गोष्टींना सहमती दर्शवत नाही. अशातच पाकिस्तान एशिया कपचा बहिष्कार करू शकतो, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. जर पाकिस्तान एशिया कपमध्ये सामील झाली नाही, तर क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलेलं पाहायला मिळेल.