भारतातील ‘इंडियन प्रिमियर लीग’प्रमाणेच पाकिस्तामध्येही ‘पाकिस्तान सुपर लीगटचे (पीएसएल) आयोजन केले जाते. एकीकडे या क्रिकेट सामन्यांची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी केलेल्या ट्विट्सची चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांना तसेच उच्चपदस्थ लोकांना पीसएलचे सामने पाहण्यासाठी मोफत तिकीट मागू नये, असे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी खास ट्विट्स केले आहेत.

हेही वाचा >>> तीन दिवसांनंतर अखेर भारतीय कुस्तीपटूंचं दिल्लीतील आंदोलन मागे; आरोपांची समितीकडून होणार चौकशी!

नजम सेठी काय म्हणाले?

एका महिन्यानंतर पीसीबीचे सामने सुरू होणार आहेत. असे असताना नजम सेठी यांनी एक खास ट्वीट केले आहे. “पुढील महिन्यात पीएसएलचे सामने सुरू होत आहेत. त्यामुळे मी माझ्या मित्रांना तसेच उच्चपदस्थांना विनंती करतो की त्यांनी पीएसएलचे सामने पाहण्यासाठी मोफत तिकिटांसाठी विचारणा करून नये. नॅशनल असेंब्लीच्या एका समितीने असे करण्यास मनाई केली आहे, ” असे सेठी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती; भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय!

नोकरीसाठी शिफारस करू नये

नजम सेठी यांनी नोकरीसाठी कोणीही मला शिफारस करू नये, असेही आवाहन केले आहे. “कोणत्याही खेळाडूची, प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी शिफारीश करू नये. तसेच अपात्र व्यक्तीला नोकरी देण्यासाठी विचारणा करू नये. पीसीबी ही जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक आहे,” असेही सेठी म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढील महिन्यात पीएसएलच्या आठव्या हंगामाला सुरवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना मुलतान सुलतान्स आणि लाहोर कलंदर या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. या हंगामातील सामने पाकिस्तानमधील लाहोर, रावळपिंडी तसेच अन्य शहरांत खेळवला जाणार आहेत.

Story img Loader