PCB chairman Zaka Ashraf resigns : पाकिस्तान क्रिकेट सध्या वाईट दौऱ्यातून जात आहे. एकीकडे पाकिस्तानचा संघ मैदानावर पराभूत होत आहे, तर दुसरीकडे पीसीबीमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरू आहे. अलीकडेच, मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. आता झका अश्रफ यांनी अचानकपणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. झका अश्रफ यांनी अवघ्या ६ महिन्यांतच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीनंतर राजीनामा जाहीर केला –

नजम सेठी यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर झका अश्रफ यांनी सहा महिन्यांपूर्वी जूनमध्ये हे पद स्वीकारले होते. लाहोरमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर झका अश्रफ यांनी अचानक राजीनामा जाहीर केला. पीसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बैठकीच्या शेवटी, झका अश्रफ यांनी जाहीर केले की त्यांनी एमसीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा माननीय संरक्षक कार्यवाहक पंतप्रधान अन्वर-उल-हक कक्कर यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.”

झकाने दोन वर्षांपूर्वी पीसीबीचे नेतृत्व केले होते –

२०११ ते २०१३ या काळात पीसीबीचे नेतृत्व करणाऱ्या झका अश्रफ यांना पाकिस्तानमध्ये सरकार बदलल्यानंतर नजम सेठी यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना पीसीबीच्या व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी राहण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

हेही वाचा – Danish Kaneria : ‘माझे रामलल्ला…’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

राजीनाम्याचे कारण काय?

झका अश्रफ यांच्या अचानक राजीनाम्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यातील एक त्यांची शैक्षणिक पात्रता आहे. झका अश्रफ हे पदवीधर नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता आणि पाकिस्तान क्रिकेट संघाची नुकतीच झालेली कामगिरी लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिल्याचेही बोलले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan cricket board president zaka ashraf has resigned vbm
Show comments