Pakistan Cricket Board Central Contracts: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२४-२५ आंतरराष्ट्रीय हंगामासाठी आपला केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये २५ पुरुष क्रिकेटपटूंना १२ महिन्यांसाठी केंद्रीय करार देण्यात आला आहे. हा करार १ जुलै २०२४ पासून अंमलात येईल आणि त्याअंतर्गत करार देण्यात आले आहेत. ज्यावर गेल्या वर्षी खेळाडूंमध्ये एकमत झाले होते. पीसीबीने प्रथमच पाच नवीन खेळाडूंचा केंद्रीय करारात समावेश केला आहे.

अ श्रेणीतील क्रिकेटपटू

खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद इरफान खान आणि उस्मान खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रथमच केंद्रीय करार दिला आहे. या पाचही खेळाडूंना ड श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पीसीबीने केवळ दोन खेळाडूंना अ श्रेणीमध्ये ठेवले आहे. यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. तर तीन खेळाडूंचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद यांचा समावेश आहे. अलीकडेच मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. पाकिस्तानने २०२१ नंतर घरच्या भूमीवर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

३ स्टार खेळाडूंना पीसीबीने संधी दिली नाही

हसन अली, सर्फराज अहमद आणि फखर जमान या स्टार खेळाडूंचा पीसीबीच्या केंद्रीय करारात समावेश करण्यात आलेला नाही. या खेळाडूंना गेल्या काही काळात चांगली कामगिरी करता आली नाही. कदाचित याच कारणामुळे त्यांना करारातून मुक्त करण्यात आले आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षी शाहीन आफ्रिदीचा अ श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी त्याला ब श्रेणीत ठेवण्यात आले आहे. शादाब खानलाही ब मधून क श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – Mohammed Shami: “BCCI आणि चाहत्यांची माफी मागतो पण…”, मोहम्मद शमीने अचानक पोस्ट शेअर करत का मागितली माफी? पाहा VIDEO

पीसीबीने जाहीर केलेल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी

अ श्रेणी (2): बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान

ब श्रेणी (3): नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद

क श्रेणी (9): अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, हरिस रौफ, नोमान अली, सय्यम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील आणि शादाब खान

ड श्रेणी (११): आमिर जमाल, हसीबुल्ला, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद इरफान खान, मोहम्मद वसीम जूनियर आणि उस्मान खान