Pakistan cricket team wearing saffron caps on the field photos viral : जगभरातील क्रिकेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे. पाकिस्तानही यासाठी तयारी करत आहे, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत गेल्या काही दिवसांपासून बरेच वादंग निर्माण झाले आहेत. अशात आता पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेचे कारण पाकिस्तान क्रिकेट संघाने परिधान केलेली भगवी टोपी आहे. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलावायो येथे रविवारी झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संपूर्ण पाकिस्तान संघ भगव्या रंगाच्या टोप्या घालून मैदानात उतरला होता. तोच भगवा रंग जो पाकिस्तानच्या बहुतेक खेळाडूंना आवडत नाही. हे आम्ही म्हणत नाही, पण गेल्या वर्षी जेव्हा पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात आला होता, तेव्हा त्यांचे भगवे मफरेल घालून स्वागत करण्यात आले होते, त्यावेळी अनेक खेळाडूंनी तो घालण्यास नकार दिला होता.

पाकिस्तानच्या खेळाडूंनी का घातल्या भगव्या टोप्या?

पकिस्तानचा संघ भगवी टोपी घालून सामना खेळत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे दृश्य तुम्ही याआधी कधी पाहिले नसेल. आता या मागचे कारण जाणून घेऊया. खरं तर, कर्करोग जागृतीसाठी योगदान म्हणून, पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघाच्या खेळाडूंनी बुलावायो येथे रविवारी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भगव्या टोप्या परिधान केल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या उपक्रमाचा उद्देश कर्करोगाने बाधित मुलांशी एकता दाखवणे आणि त्यांच्या कल्याणासाठी जागरुकता वाढवणे आहे.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi IPL 2025 : BCCI ने वैभव सूर्यवंशीच्या हाडांची केली होती चाचणी? लिलावात राजस्थानने १.१ कोटी रुपयांच्या बोलीसह केलं खरेदी

दोन्ही संघांनी मैदानात प्रवेश करताच भगव्या टोप्या परिधान केल्या, ज्याने या मालिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले. पाकिस्तान संघ हा नेहमी जर्सीप्रमाणे गडद हिरव्या रंगाची टोपी घालून खेळतो. पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यजमान झिम्बाब्वेने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ८० धावांनी पराभव करून क्रिकेट विश्वाला चकित केले. आता या दोन्ही संघातील दुसरा सामना आज खेळला जात आहे. ज्यामध्ये पण दोन्ही संघ भगव्या टोप्या घालून मैदानात उतरले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan cricket team wearing saffron caps on the field in the odi series against zimbabwe photos goes viral vbm