भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा युवा पिढीसाठी प्रेरणास्रोत असल्याचे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने म्हटले आहे. कोहलीने कसोटीचे कर्णधारपद सोडल्यानंतर आमिरने हे ट्वीट केले आहे. शनिवारी विराटने सर्वांनाच धक्का देत भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. आता विराट कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्णधार नाही आणि तो भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून असेल, विराटने ६८ दिवसांत तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराटने सप्टेंबरमध्ये टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि टी-२० वर्ल्डकप २०२१ नंतर संघाचे नेतृत्व सोडले. यानंतर डिसेंबर महिन्यात निवड समितीने रोहितला वनडेचे कर्णधारपद सोपवले. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आमिरने ट्विटरवर म्हटले, “विराट भावा, माझ्या मते तू क्रिकेटमधील आगामी पिढीचा खरा नेता आहेस. कारण तू युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेस. मैदानावर आणि मैदानाबाहेर कमाल करत राहा.”

हेही वाचाIND vs SA : नवा कॅप्टन बोलत राहिला अन् विराट ऐकत राहिला..! BCCIनं शेअर केले PHOTO

२०१७मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला, जिथे पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव करून विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात मोहम्मद आमिरने विराट कोहलीची विकेट घेतली. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात आमिरनेच कोहलीला तंबूत पाठवले होते. मात्र, या सामन्यात टीम इंडियाने ८९ धावांनी विजय मिळवला. २०१६ च्या टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामन्यापूर्वी विराट कोहलीने मोहम्मद आमिरला त्याची बॅट भेट म्हणून दिली होती.

विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे ज्यात भारताने ४० सामने जिंकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan cricketer mohammad amir says virat kohli is a true leader adn