पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून वाँडर्स येथे सुरुवात होणार असून पाकिस्तान संघाला क्रिकेटपटूंच्या दुखापतींची चिंता सतावत आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे पाकिस्तानचा सलामीवीर तौफिक उमरने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे नासीर जमशेद कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता आहे. डेल स्टेन, वेर्नान फिलँडर आणि मॉर्ने मॉर्केल या त्रिकूटाच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ या सामन्यात कर्णधारपदाचे शतक साजरे करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला दुखापतींची चिंता
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून वाँडर्स येथे सुरुवात होणार असून पाकिस्तान संघाला क्रिकेटपटूंच्या दुखापतींची चिंता सतावत आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे पाकिस्तानचा सलामीवीर तौफिक उमरने या दौऱ्यातून माघार घेतली आहे.
First published on: 01-02-2013 at 04:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan face south africa under injury worries