भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही काळापासून जबरदस्त कामगिरी करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या झालेल्या निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तर त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींमध्ये शानदार कामगिरी करून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने पंड्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. हार्दिक पंड्याला दोन वर्ष संघाबाहेर ठेवून निवड समितीने योग्य निर्णय घेतला, असे त्याचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनलवर हार्दिक पंड्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “पंड्याला दोन वर्षांसाठी संघाबाहेर ठेवणे हा चांगला निर्णय होता. त्यापूर्वी तो आयुष्यात खूपच कॅज्युअल होता. पण, दोन वर्षे झटका बसल्यानंतर आता तो अधिक परिपक्व दिसत आहे. पंड्या संघाला संतुलीत ठेवण्याचे काम करतो. त्याने आपल्या फिटनेसवरही प्रचंड कष्ट घेतल्याचे दिसत आहे.”

हेही वाचा – याला म्हणतात आगीतून फुफाट्यात! सुट्ट्यांसाठी पॅरिसला गेलेला विराट कोहली अडकला उष्णतेच्या लाटेत

शोएबने हार्दिकला एक सल्लाही दिला आहे. तो म्हणाला, “हार्दिकने मैदानाबाहेर मस्ती करून नये. कारण, तो खूप दुर्मिळ खेळाडू आहे. तो एक उत्तम क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट वेगवान गोलंदाजही आहे. संघ अडचणीत असताना तो चांगली कामगिरी करतो. तो जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देखील बनू शकतो.”

हेही वाचा – CWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का; उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोन खेळाडू दोषी

शोएब अख्तर अनेक दिवसांच्या खंडानंतर आपल्या युट्युब चॅनेलवर दिसला. त्याने हार्दिक पंड्याशिवाय ऋषभ पंतचे देखील कौतुक केले आहे. सोबतच पाकिस्तान आणि श्रीलंकन संघाच्या कामगिरीबाबतही तो बोलला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan former bowler shoaib akhtar comment about hardik pandya fitness vkk