ODI World Cup2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. चौथ्यांदा ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. मात्र, भारत एकट्याने या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने पाकिस्तान, श्रीलंका किंवा बांगलादेशसोबत विश्वचषकाचे सह-यजमानपद भूषवले आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यास ५ महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे, मात्र अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. याचे सर्वात मोठे कारण पाकिस्तान आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषक २०२३च्या एका नव्हे तर तीन सामन्यांच्या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानमुळे, आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. स्पर्धेचे यजमान बीसीसीआयने आयसीसीला पाठवलेल्या वेळापत्रकाचा मसुदा पाकिस्तानने मान्य केलेला नाही. पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमदाबादमधील प्रस्तावित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या, चेन्नईतील प्रस्तावित पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना आणि विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात बंगळुरूमध्ये होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या तीन ठिकाणांवर आक्षेप घेतला आहे. ईएसपीएनक्रिकइंफोच्या न्यूजनुसार, पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, “भारताने हे जाणूनबुजून असे वेळापत्रक बनवले आहे.”

हेही वाचा: World Father’s Day: शतकवीर उस्मान ख्वाजा लाडक्या लेकीला घेऊन पत्रकार परिषदेत पोहचला आणि…, Video पाहा

भारताने सुरक्षेच्या कारणास्तव आशिया कप २०२३साठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानही भारतात येण्यास नकार देऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण जाहीर झाल्यानंतर त्यांनी म्हटले आहे की, ते भारतात येणार की नाही हे त्यांच्या म्हणजे पाकिस्तानच्या सरकारवर अवलंबून आहे. दरम्यान, या स्पर्धेतील दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी पाकिस्तानकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानचा भारतावर मोठा आरोप

आयसीसीने अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले नाही. मात्र, ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. याशिवाय पाकिस्तानला चेन्नईमध्ये अफगाणिस्तान आणि बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. क्रिकेट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या दोन सामन्यांचे ठिकाण बदलू इच्छित आहे. अहवालात असे म्हटले आहे की काही अधिकार्‍यांनी असा आरोप केला आहे की, “भारताने मुद्दाम अशा ठिकाणी सामने आयोजित केले आहेत जिथे पाकिस्तान संघाला खेळपट्टीची परिस्थिती, सराव सुविधा आणि प्रवास व्यवस्थेशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.”

हेही वाचा: Ishan Kishan: वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी इशान किशनचे मोठे विधान, म्हणाला, “दुलीप ट्रॉफी खेळण्यापेक्षा मी एनसीएमध्ये जाणार…”

अफगाणिस्तानला घाबरला पाकिस्तान क्रिकेट संघ

पाकिस्तानच्या अहवालानुसार, चेन्नईची खेळपट्टी स्पिनरसाठी अनुकूल मानली जाते, जी अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तान संघासाठी आव्हानात्मक ठरू शकते, ज्यात प्रतिभावान फिरकी गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईला आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना बंगळुरूला हलवण्याची विनंती केली आहे.