ODI World Cup2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. चौथ्यांदा ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. मात्र, भारत एकट्याने या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने पाकिस्तान, श्रीलंका किंवा बांगलादेशसोबत विश्वचषकाचे सह-यजमानपद भूषवले आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यास ५ महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे, मात्र अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. याचे सर्वात मोठे कारण पाकिस्तान आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषक २०२३च्या एका नव्हे तर तीन सामन्यांच्या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानमुळे, आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. स्पर्धेचे यजमान बीसीसीआयने आयसीसीला पाठवलेल्या वेळापत्रकाचा मसुदा पाकिस्तानने मान्य केलेला नाही. पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमदाबादमधील प्रस्तावित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या, चेन्नईतील प्रस्तावित पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना आणि विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात बंगळुरूमध्ये होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या तीन ठिकाणांवर आक्षेप घेतला आहे. ईएसपीएनक्रिकइंफोच्या न्यूजनुसार, पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, “भारताने हे जाणूनबुजून असे वेळापत्रक बनवले आहे.”
भारताने सुरक्षेच्या कारणास्तव आशिया कप २०२३साठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानही भारतात येण्यास नकार देऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण जाहीर झाल्यानंतर त्यांनी म्हटले आहे की, ते भारतात येणार की नाही हे त्यांच्या म्हणजे पाकिस्तानच्या सरकारवर अवलंबून आहे. दरम्यान, या स्पर्धेतील दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी पाकिस्तानकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानचा भारतावर मोठा आरोप
आयसीसीने अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले नाही. मात्र, ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. याशिवाय पाकिस्तानला चेन्नईमध्ये अफगाणिस्तान आणि बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. क्रिकेट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या दोन सामन्यांचे ठिकाण बदलू इच्छित आहे. अहवालात असे म्हटले आहे की काही अधिकार्यांनी असा आरोप केला आहे की, “भारताने मुद्दाम अशा ठिकाणी सामने आयोजित केले आहेत जिथे पाकिस्तान संघाला खेळपट्टीची परिस्थिती, सराव सुविधा आणि प्रवास व्यवस्थेशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.”
अफगाणिस्तानला घाबरला पाकिस्तान क्रिकेट संघ
पाकिस्तानच्या अहवालानुसार, चेन्नईची खेळपट्टी स्पिनरसाठी अनुकूल मानली जाते, जी अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तान संघासाठी आव्हानात्मक ठरू शकते, ज्यात प्रतिभावान फिरकी गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईला आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना बंगळुरूला हलवण्याची विनंती केली आहे.