भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्यासाठी पाकिस्तान हॉकी फेडरेशने पुन्हा एकदा धावाधाव करायला सुरुवात केली आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानने ओल्टमन्स यांना पाकिस्तान संघाला प्रशिक्षण देण्याची ऑफर दिल्याचं समजतं आहे. २००४-०४ या काळात ओल्टमन्स यांनी पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं.

पाकिस्तान हॉकी फेडरेशनमधील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोलंट ओल्टमन्स काही दिवसांपूर्वी ओमानमध्ये होते. यावेळी पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याशी ओल्टमन्स यांनी चर्चा केल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार ओल्टमन्स यांनी पाकिस्तान हॉकी फेडरेशनचा प्रस्ताव मान्य केल्यास आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते पाकिस्तान संघाला प्रशिक्षण देतील. सध्या पाकिस्तानचा संघ ओमानमध्ये तिरंगी मालिका खेळत आहे.

अवश्य वाचा – अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, सरदार सिंहचं संघात पुनरागमन

२०१३ पासून रोलंट ओल्टमन्स हे हॉकी इंडियाशी संलग्न आहेत. सुरुवातीचा काहीकाळ ओल्टमन्स यांनी High Performance Director तर नंतरचा काही काळ भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाचं काम पाहिलं होतं. पाकिस्तान हॉकी संघ गेल्या काही स्पर्धांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नाहीये. त्यामुळे आगामी राष्ट्रकुल, आशियाई खेळ यांसारख्या महत्वाच्या स्पर्धा लक्षात घेता संघाची कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तान हॉकी फेडरेशन ओल्टमन्स यांना गळ घालत असल्याचं समजतंय.

Story img Loader