Kamran Ghulam abuses Rabada And Verreynne: भारत-ऑस्ट्रेलियाप्रमाणेच दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा संघ २११ धावा करत सर्वबाद झाला. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळात एकूण १३ विकेट पडल्या असताना, मैदानावर खेळाडूंमध्ये शिवीगाळही पाहायला मिळाली. कामरान गुलामने या सामन्यात ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली पण त्याने या सामन्यात आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना शिवीगाळ केल्याने चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात कामरान गुलाम फलंदाजी करत असताना प्रथम आफ्रिकन संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाशी वाद घालताना दिसला आणि त्यानंतर त्याने काही अपशब्दही वापरले. कामरान इथेच थांबला नाही आणि रबाडानंतर त्याचा आफ्रिकेचा विकेटकिपर काइल व्हर्नीसोबत वाद झाला ज्यामध्ये त्यालाही उत्तर मिळाले. व्हर्नीबरोबर बोलताना त्याने पुन्हा पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत शिवी दिली, ज्याचा व्हीडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वीही कामरानला मैदानावर आपला राग आवरता आलेला नाही.

हेही वाचा – IND vs AUS: भारताला मेलबर्न कसोटीत फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची आवश्यकता? जाणून घ्या

पाकिस्तानकडून कामरान गुलामने सर्वाधिक धावा केल्या. मात्र मैदानावरील त्याच्या या वागण्यामुळे तो ट्रोल झाला आहे. त्याने गोलंदाजी करण्यासाठी रनअप घेतलेल्या रबाडाला गुलामने मध्येच रोखले आणि वर त्यालाच शिवीगाळ केली. हे पाहून विकेटकिपर त्याच्याशी बोलत होता यावरून त्याने विकेटकिपरलाही शिव्या दिल्या.

रिप्लेमध्ये असे दिसून आले की जेव्हा गुलाम रबाडाच्या चेंडूवर फटका खेळण्यासाठी तयार होत होता, तेव्हा साई़डस्क्रीनवर काहीतरी हालचाल दिसत होती, ज्यामुळे त्याने गोलंदाजाला थांबवले. मात्र, रबाडा यावर खूश दिसला नाही आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे सामना काही काळ थांबला होता.

हेही वाचा – IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? उस्मान ख्वाजाने सांगितला प्रसंग

आता त्याला त्याच्या या कृतीची भरपाई द्यावी लागू शकते ज्यामध्ये सामनाधिकारी त्याच्यावर कठोर कारवाई करू शकतात. कामरानच्या अर्धशतकामुळे पाकिस्तान संघाला पहिल्या डावात २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. पण आफ्रिकेच्या संघानेही चांगली गोलंदाजी करत फार काळ त्याला मैदानावर टिकू दिले नाही.

हेही वाचा – IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…

पाकिस्तानकडून कामरान गुलामने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याच्यानंतर दुसरी मोठी धावसंख्या आठव्या क्रमांकाचा फलंदाज अमीर जमालची (२८) होती. मोहम्मद रिझवाननेही २७ धावांचे योगदान दिले. बॉशने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि नवा विक्रम घडवला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद (१७) याला बाद करून त्याने ही कामगिरी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan kamran ghulam abuses kagiso rabada and wicketkeeper in live match of pak vs sa test watch video bdg