बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या पाकिस्तानात न खेळण्याच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास तयार नसेल, तर आम्ही २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संघ पाठवणार नाही, अशी भूमिका पीसीबीकडून घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा – टी२० विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोणते संघ खेळणार? सचिन तेंडुलकरने केली भविष्यवाणी, म्हणाला…

पीटीआयच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या पाकिस्तानात न खेळण्याच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. जर भारतीय क्रिकेट बोर्ड २०२३ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास तयार नसेल, तर पाकिस्तानही भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघ पाठवणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या प्रकरणी एसीसीला ( ACC ) पत्र पाठवून पुढील महिन्यात मेलबर्नमध्ये तातडीची बैठक बोलवण्याची मागणी करणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022: नेदरलँड्सच्या विजयाने श्रीलंकेच्या अडचणीत भर, पंजाबच्या फलंदाजाची जबरदस्त खेळी

दरम्यान, काल (मंगळवारी ) बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी २०२३ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पाठवणार नसल्याचे म्हटले होते. तसेच ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

Story img Loader