Pakistan Out Of World Cup: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी उपांत्य फेरीच्या चढाओढीतून पाकिस्तान बाहेर पडणार याची पूर्ण शक्यता आहे. पण त्यावर १०० टक्के निर्णय येण्यासाठी आजचा पाक विरुद्ध इंग्लंड सामना पाहणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, इंग्लंड विरुद्ध सामना सुरु होण्याआधीच ICC ने भारत विरुद्ध न्यूझीलंडची हिंट देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. विश्वचषकाच्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिका संघ १६ नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे. तर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ भारत अजूनही प्रतिस्पर्धी कोण असणार हे ठरण्याची वाट पाहात आहे.
पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत असूनही, ICC ने गेटवे ऑफ इंडिया येथे दिवाळी सेलिब्रेशनच्या एका व्हिडिओने उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे असे दर्शवले आहे. शुक्रवारी रात्री X वर शेअर केलेल्या तीन मिनिटांच्या क्लिपमध्ये मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर चमकदार 3D व्हिडीओ लावण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये चार कर्णधारांच्या चित्रांसह विश्वचषक स्पर्धेचा शेवटपर्यंतचा एक छोटासा हायलाइट होता. त्यात एका बाजूला ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा आणि दुसऱ्या बाजूला भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन दिसत होता.
पाकिस्तान बाहेर, उपांत्य फेरीत IND vs NZ
हे ही वाचा<< “पाकिस्तान World Cup उपांत्य फेरीत जाणार, फक्त..”, बाबर आझमने PAK vs ENG अशक्य सामन्याचा प्लॅन सांगितला
ICC च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “पाकिस्तान बाहेर पडेपर्यंत तरी थांबा”, “ICC पाकिस्तानला ट्रोल करतंय” अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, १५ नोव्हेंबरपासून उपांत्य फेरीला सुरुवात होणार आहे. जर भारताचा उपांत्य फेरीत होणार सामना न्यूझीलंड विरुद्ध झाला तर मुंबईत होणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना कोलकात्यात होईल. जर पाकिस्तानने आज अशक्यप्राय विजय मिळवला तर मात्र ठिकाणे उलट होतील.