गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीवर बरीच टीका होत आहे. टी-२० विश्वचषक २०२१ मधील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा झेल सोडल्याबद्दल त्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले. पुन्हा एकदा तो नव्या वादांमुळे चर्चेत आले आहेत. पाकिस्तान सुपर लीग २०२१ (PSL) प्लेअर्स ड्राफ्टनंतर मीडियाशी बोलताना हसनने एका पत्रकाराशी गैरवर्तन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्लामाबाद युनायटेडचा गोलंदाज हसन अलीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, मात्र एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्याने नकार दिला. पत्रकाराने आपला प्रश्नही पूर्ण केला नाही, तोच हसन मधेच म्हणाला की पुढील प्रश्न प्लीज. असे त्याने अनेक वेळा केले. हसन अलीच्या वागण्याने निराश झालेल्या पत्रकाराने सांगितले, की हे चांगले वर्तन नाही.

हेही वाचा – IPL 2022 : खुशखबर..! सौरव गांगुलीनं दिलं ‘मोठं’ अपडेट; एका क्लिकवर वाचा काय म्हणाला दादा!

यानंतर हसनने प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, ”आधी तुम्ही ट्विटरवर चांगल्या गोष्टी लिहा आणि त्यानंतर मी तुम्हाला उत्तर देईन. तुम्ही कोणाशीही वैयक्तिक राग म्हणून वागू नका. पीसीबी (प्रश्न विचारण्यापासून) तुम्हाला थांबवू शकत नाही. निदान आम्हाला तरी अधिकार आहे.”

या पत्रकाराचे नाव अनस सईद असे आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला हसनवर कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन न केल्याबद्दल टीका केली होती. ट्विटरवर हसन अलीचा एक व्हिडिओ शेअर करताना तो म्हणाला, ”प्रवासादरम्यान प्रोटोकॉलनुसार सोप्या शब्दात मास्क घालणे आवश्यक आहे. ते काढणाऱ्यांना दंड होऊ शकतो.”

हसन अलीनेही सईदच्या त्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली होती आणि म्हटले होते, की ”जुना व्हिडिओ घेऊन नाटक करू नका. आधी तुमची वस्तुस्थिती तपासा. खोटा मसाला देण्याची गरज नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan pacer hasan ali controversial argument with a journalist watch video adn