पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज वहाब रियाझने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये वहाब रियाझ रस्त्यावर चणा विकताना दिसत आहे. ३६ वर्षीय रियाझ जवळपास दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
वहाब रियाझने त्याच्या ट्विटर हँडलवर रस्त्यावर चणा विकतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत रियाझने लिहिले, “तुमचा आजचा चणावाला काका! मी काय बनवायचे आणि कितीचे बनवायचे अशी तुमची ऑर्डर पाठवा. या खास हातगाडीभोवती थोडा वेळ घालवताना मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण आली.”
हेही वाचा – IND vs SA : मुंबई इंडियन्सचा खेळाडू पुन्हा भारतीय संघात परतला..! करोनाग्रस्त वॉशिंग्टन सुंदरची घेणार जागा
वहाब रियाझने २७ कसोटी, ९१ एकदिवसीय आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत ८३, एकदिवसीय सामन्यात १२० आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३४ बळी आहेत. वहाब रियाझने त्याच्या कारकिर्दीत १००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीन अर्धशतके आहेत.
२०११च्या एकदिवसीय विश्वचषकात मोहाली येथील भारताविरुद्धच्या सामन्यात वहाबने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५ गडी मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.