Paris Olympic 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सुरु झाली आहे. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ऑलिम्पिकचा स्पर्धेचं उद्घाटन २६ जुलै रोजी झालं. या कार्यक्रमात सहभागी देशांनी परेड केली. यामध्ये पाकिस्तानची तुकडीही सहभागी होती. मात्र, याचवेळी एका समालोचकाने लाईव्ह शोमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या तुकडीच्या आकारावर केलेल्या एका टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे.

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानची परेड सीन नदीवरून जात असताना लाईव्ह शो मध्ये एका समालोचकाने म्हटलं की, “आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तानचा संघ १८ सदस्यांसह ऑलिम्पिकमध्ये पोहोचला आहे. या १८ सदस्यांच्या संघात फक्त ७ खेळाडू आहेत तर ११ अधिकारी आहेत. पाकिस्तान हा २४ कोटी लोकांचा देश आहे. पण ऑलिम्पिकमध्ये फक्त ७ खेळाडू सहभागी होण्यासाठी आले आहेत.”

Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Trumps foreign aid freeze could hurt bankrupt Pakistan
ट्रम्प यांचा दिवाळखोर पाकिस्तानला दणका; थांबवली आर्थिक मदत, याचा परिणाम काय?
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”
russia ukraine war
Russia Ukraine War : युद्ध थांबविण्यासाठी झेलेन्स्की तयार
trump warns Russia marathi news
Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा
Pakistan Logo On Champions Trophy Jersey
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय जर्सीवर पाकिस्तानचे नाव… आधी नकार, मग होकार! नक्की प्रकरण काय?
Jos Buttler Statement on Afghanistan Boycott a Champions Trophy 2025 Said Not the way to Go
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानविरूद्ध खेळणार नाही? जोस बटलरचं मोठं वक्तव्य

हेही वाचा : Paris Olympic 2024 : मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक

पाकिस्तानबाबत केलेल्या या विधानाचा या कॉमेंटेटरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, पाकिस्तानने शेवटचं ऑलिम्पिक पदक १९९२ मध्ये जिंकलं होतं. आतापर्यंत पाकिस्तानचा ऑलिम्पिकमधील विक्रम जास्त काही खास नाहीत. पाकिस्तानला पहिलं पदक १९५६ मध्ये मिळालं होतं. तसेच १९९२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये शेवटचं पदक जिंकलं होतं. १९९२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या हॉकी संघानं तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकलं होतं.

आता पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाकिस्तानचा पदकांचा दुष्काळ संपवतं की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पाकिस्तानने आतापर्यंत फक्त १० पदकं जिंकली आहेत. हॉकी संघाने ८ पदके जिंकली आहेत. पाकिस्तानच्या या १० पदकांमध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, अनेक पाकिस्ताच्या नागरिकांनी ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत संबधित कॉमेंटेटरबाबत नाराजी व्यक्ती केली तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader