Pakistan players fined 10 per cent of match fee for slow over rate: या विश्वचषकात पाकिस्तानसाठी काहीही चांगले घडत नाही. उपांत्य फेरी गाठण्याचा त्यांचा मार्ग मोकळा असला, तरी तो खूपच कठीण आहे. या विश्वचषकात, पहिले दोन सामने जिंकल्यानंतर, पाकिस्तानला सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्यांची ट्रेन पुन्हा रुळावर आली आहे आणि त्यांनी विजय मिळवला आहे. मात्र, असे असूनही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी संघाला आयसीसीने दणका दिला आहे.

या विश्वचषकात पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या ही त्यांची गोलंदाजी आहे, जी एकेकाळी त्यांची ताकद होती. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही पाकिस्तानचा एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. त्यामुळे त्यांनी ५० षटकांत ४०१ धावा केल्या. या कुचकामी गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही गोलंदाजी करताना इतका वेळ घेतला की त्याला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
World Test Championship 2025 How Pakistan Qualify for Final Match
PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय

आयसीसीने पाकिस्तानला दंड ठोठावला

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानचे गोलंदाज सुरुवातीपासूनच अतिशय विचारपूर्वक गोलंदाजी करत होते. चेंडू कोणाकडे सोपवायचा, क्षेत्ररक्षणाची व्यवस्था कुठे करायची, कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची अशा पेचप्रसंगात कर्णधार बाबर आझमही होता. या सर्व गोष्टींमुळे, शेवटी, पाकिस्तान संघ पहिल्या डावाच्या शेवटी निर्धारित वेळेत दोन षटके मागे राहिला, ज्यामुळे त्यांना त्यांचे काही खेळाडू ३० यार्डच्या वर्तुळात ठेवावे लागले आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. पाकिस्तानची स्लो ओव्हर रेटची शिक्षा तिथेच संपली नाही. सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघाला मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावण्यात आला.

हेही वाचा – IND vs SA: ‘बर्थडे बॉय’ विराट कोहली ठरला शतकाधीश! ४९व्या वनडे शतकासह सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

मात्र, पाकिस्तानने आपल्या फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. न्यूझीलंडच्या डोंगराएवढ्या धावसंख्येसमोर फखर जमानने ८१ चेंडूत १२६ धावांची नाबाद खेळी केली आणि बाबर आझमनेही त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ दिली. या शानदार फलंदाजीच्या जोरावर आणि पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस पद्धतीच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना २१ धावांनी जिंकला.