IND vs PAK Pakistan replaces Fakhar Zaman with Imam ul Haq fort Champion Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. मात्र, या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना २३ फेब्रुवारी दुबई येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तान संघांत होणार आहे, ज्याची चाहत्यांना खूप प्रतिक्षा आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या स्टार खेळाडूला दुखापत झाली होती. आता तो संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.
हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून पडला बाहेर –
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण करताना फखर झमानला दुखापत झाली होती. आता त्याच्या जागी बोर्डाने पाकिस्तानी संघात इमाम उल हकची निवड केली आहे. फखर झमान जबरदस्त फॉर्ममध्ये होता. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानसाठी झमान खूप महत्त्वाचा होता. पण आता तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत फखर झमानने शानदार फलंदाजी केली होती.
या मेगा स्पर्धेत तो पाकिस्तानसाठी चमकदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला फखरची साथ मिळू शकणार नाही. गेल्या ४ एकदिवसीय डावांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ८४, ४१, १० आणि २४ धावा केल्या आहेत. जर आपण त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने ३ कसोटी सामन्यांमध्ये ३२ च्या सरासरीने १९२ धावा केल्या आहेत. ८६ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जमानने ४६.२१ च्या सरासरीने ३६५१ धावा केल्या आहेत. जमानच्या बॅटने ९२ टी-२० सामन्यांमध्ये १८४८ धावा केल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तान संघ:
मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, इमाम उल हक, सौद शकील, कामरान गुलाम, तय्यब ताहिर, सलमान अली आघा, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, मुहम्मद हसनैन, हरिस रौफ.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर