तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १२७ धावांनी मात
इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकत पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात टाकली आहे. पाकिस्तानने इंग्लंडपुढे विजयासाठी २८४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानने इंग्लंडला १५६ धावांमध्ये गुंडाळत १२७ धावांनी विजय मिळवला.
गुरुवारी २ बाद ४६ या धावसंख्येवरून पुढे खेळताना इंग्लंडला दुसऱ्या षटकात जो रुटला (६) गमवावे लागले. त्यानंतर सातत्याने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि पाकिस्तानने विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने ४ चौकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी साकारत एकाकी लढत दिली. पण शोएब मलिकने त्याचा अडसर दूर करीत संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. कुक बाद झाल्यावर सहा धावांमध्ये इंग्लंडचा डाव संपुष्टात आला.
या सामन्यातील दुसऱ्या डावात १५१ धावांची खेळी साकारणाऱ्या मोहम्मद हफिझला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, तर मालिकेत भेदक मारा करणारा फिरकीपटू यासिर शाहला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पाकिस्तानने सामन्यासह मालिका जिंकली
पाकिस्तानने इंग्लंडला १५६ धावांमध्ये गुंडाळत १२७ धावांनी विजय मिळवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-11-2015 at 06:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan seal series 2 0 with 127 run win over england