India vs Pakistan World Cup: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे वर्ल्ड कप २०२३च्या वेळापत्रकावर आपली अधिकृत भूमिका शेअर केली आहे. पीसीबीच्या प्रवक्त्याने पुन्हा एकदा पाकिस्तान संघाच्या सुरक्षेच्या मुद्यावर जोर दिला. ते म्हणाले की, “या स्पर्धेत संघाचा सहभाग सरकारच्या मान्यतेच्या अधीन आहे.” मात्र, एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पीसीबी पाकिस्तानचे सामने खेळणार असलेल्या ठिकाणी सुरक्षा पथक पाठवण्याची तयारी करत आहे.

पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “बोर्डाला सामन्यांच्या ठिकाणांसह भारताच्या कोणत्याही दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारची परवानगी आवश्यक आहे. आम्ही मार्गदर्शनासाठी आमच्या सरकारशी संपर्क साधत आहोत आणि त्यांच्याकडून ऐकताच इव्हेंट अथॉरिटी ICCला अपडेट करू. ही स्थिती आम्ही काही आठवड्यांपूर्वी आयसीसीला कळवल्यानुसार आहे, जेव्हा त्यांनी आमच्यासोबत मसुदा शेड्यूल शेअर केला आणि आमचा अभिप्राय मागवला.”

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

पीसीबीने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरकारला सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली असताना, ते ठिकाणांबाबत आयसीसीकडेही संपर्क साधू शकतात, जे केवळ यजमान भारताविरुद्धच्या सामन्यांपुरते मर्यादित असेल असे नाही. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या माहितीनुसार, भारतात ज्या-ज्या ठिकाणी पाकिस्तानचा संघ सामने खेळणार आहे त्या-त्या ठिकाणी पाकिस्तान सरकारचे एक सुरक्षा पथक पाहणी करणार आहे. त्यांच्या पाहणी दरम्यान ते सुरक्षेसंबंधी एक अहवाल तयार करतील आणि त्यांच्या सरकारला देतील. यावर पाकिस्तान सरकार पीसीबीला एनओसी देण्याबाबत विचार करेल. जर त्यांनी एनओसी दिला तर पाकिस्तानचा संघ भारतात विश्वचषक खेळण्यास येऊ शकतो.

हेही वाचा: Raunak Sadhwani: क्रिकेटचा त्याग करून १३ वर्षीय रौनक साधवानी कसा बनला चेस ग्रँडमास्टर? जाणून घ्या

क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ईदच्या सुटीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल. यानंतर, सुरक्षा शिष्टमंडळ भारतात कधी पाठवायचे याचा निर्णय परराष्ट्र आणि गृह मंत्रालयासह सरकार घेईल. या प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही आणि ती सरकारच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. काही संघांनी मोठ्या कार्यक्रमांपूर्वी असे सुरक्षा मूल्यमापन करणे हा नियमांचा एक भाग आहे.”

पाच ठिकाणी सामने खेळवले जातील

आयसीसीने जाहीर केलेल्या विश्वचषकाचे वेळापत्रक पाहिल्यास, पाकिस्तानला चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद या पाच ठिकाणी सामने खेळायचे आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “भारताच्या कोणत्याही दौऱ्यापूर्वी, क्रिकेट बोर्डाची सरकारकडून परवानगी घेणे ही एक औपचारिकता आहे, जे सहसा शिष्टमंडळ भारतात पाठवतात.

याच अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “जर शिष्टमंडळाला असे वाटत असेल की पाकिस्तानने नियोजित ठिकाणाऐवजी अन्य ठिकाणी खेळणे चांगले होईल, तर ते आपल्या अहवालात त्याचा उल्लेख करतील. जर त्यात काही कमतरता दिसली किंवा काही चिंता व्यक्त केली, तर हा अहवाल आयसीसी आणि बीसीसीआयला शेअर केला जाईल.”

हेही वाचा: IND vs WI: चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज! विंडीज बोर्डाने १८ सदस्यीय खेळाडूंचा केला संघ जाहीर

पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “२०१६मध्ये पाकिस्तानने टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी शेवटचा प्रवास केला तेव्हा सरकारने ठिकाणांची पाहणी करण्यासाठी संयुक्त शिष्टमंडळ पाठवले होते. त्यांच्या सूचनेवरून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना धरमशाला येथून कोलकात्यात हलवण्यात आला होता. सरकार पीसीबीला मान्यता देईल तेव्हाच विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागाची अंतिम घोषणा केली जाईल. हाच नियम इतर खेळांनाही लागू होतो. भारतात येण्यापूर्वी सरकारची परवानगी अनिवार्य आहे. हॉकी आणि फुटबॉल फेडरेशनलाही भारतात येण्यापूर्वी तेच करावे लागले होते.”

Story img Loader