पाकिस्तानचा स्टार कर्णधार बाबर आझम आणि श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा हे सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात त्यांच्या सनसनाटी कामगिरीनंतर जगातील अव्वल टी-२० फलंदाज आणि गोलंदाज बनले आहेत. वर्ल्डकपमध्ये बाबर आझम फलंदाज आणि कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. सलग चार सामने जिंकल्यानंतर, पाकिस्तान टी-२० वर्ल्ड २०२१ च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ बनला आहे. बाबरने इंग्लंडच्या डेव्हिड मलानला मागे टाकत टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

केवळ टी-२० मध्येच नव्हे, तर एकदिवसीय क्रमवारीतही बाबर पहिल्या स्थानावर आहे. तो आधीच आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. आझमने यावर्षी एप्रिलमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या पुढे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. एकदिवसीय क्रमवारीत आझमचे ८७३ गुण आहेत, तर कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे ८४४ आणि ८१३ गुण आहेत.

IPL Auction 2025 Who is Priyansh Arya Delhi batter sold for Rs 3 8 crore to Punjab Kings
IPL Auction 2025: कोण आहे प्रियांश आर्य? ३० लाख मूळ किंमत असलेल्या खेळाडूसाठी लागली ३ कोटींची बोली
IPL 2025 Mega Auction Mumbai Indians buy Will Jacks for 5 25 crores
Will Jacks IPL 2025 Mega Auction : लिलाव…
Akash Deep was bought by LSG and Mukesh Kumar by DC for 8 crores each in IPL 2025 Auction
IPL 2025 Auction : आयपीएल लिलावात ‘बिहारी बाबू’ मालामाल! मुकेश कुमार आणि आकाश दीपवर लागली करोडोंची बोली
Allah Ghazanfar sold to Mumbai Indians more than 4 crore ipl 2025 mega auction
Allah Ghazanfar IPL 2025 Auction : मुंबईने घेतलाय रहस्यमयी फिरकीपटू, कोण आहे अफगाणिस्तानचा नवा शिलेदार?
Deepak Chahar Bought By Mumbai Indians more than 9 crore in IPL 2025 Auction
Deepak Chahar IPL 2025 : मुंबई इंडियन्सने धोनीच्या लाडक्या खेळाडूला सीएसकेकडून हिसकावलं, ‘या’ स्टार खेळाडूवर पाडला पैशाचा पाऊस
Bhuvneshwar Kumar with RCB in IPL 2025
Bhuvneshwar Kumar IPL 2025 Auction : आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी, मूळ किमतीच्या दुप्पट किंमतीला केले खरेदी
asprit Bumrah become 2nd Indian fast bowler Captain to win the POM Award in Australia
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची कमाल! ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
IND vs AUS India Big Records with the Historic win against Australia in perth test biggest win in SENA countries
IND vs AUS: भारताने कांगारूंचा पराभव करत विक्रमांची रांगच लावली, बुमराहच्या नेतृत्वाखाली SENA देशात केला भीमपराक्रम

बाबर आझमने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने चार डावात १२४.५२च्या स्ट्राईक रेटने ६६ च्या सरासरीने १९८ धावा केल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबरने १४ गुणांची आघाडी घेतली आणि डेव्हिड मलानला मागे टाकले. मलान ८३१ वरून ९९८ गुणांवर घसरला. जेसन रॉय सहा स्थानांनी प्रगती करत १४व्या, डेव्हिड मिलर सहा स्थानांनी प्रगती करत ३३व्या आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा ५२व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – IND vs AFG: सामना कधी, कुठे कसा पाहता येणार? संभाव्य संघ कसा असणार? कोणाला संधी मिळणार?

टी-२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान टी-२० क्रमवारीत चौथ्या स्थानावर असून त्याचे ७३१ गुण आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली ७१४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. या यादीत भारताचा लोकेश राहुल ६७८ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

हसरंगा अव्वल

टी-२० गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा अव्वल स्थानावर आहे. वनिंदू हसरंगा हा एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो टी-२० विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि १४ विकेट्ससह आघाडीवर आहे. ९ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी ७७० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा आदिल रशीद आहे. अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान आणि मुजीब उर रहमान अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.