Pak vs Eng: मायदेशात सामना म्हणजे कोणत्याही संघासाठी अर्ध मोहीम फत्ते मानलं जातं. खेळपट्टी अनुकूल असते. चाहत्यांचा पाठिंबा असतो. वातावरणाची कल्पना असते. पण या सगळ्या गृहितकांना छेद देणारा घटनाक्रम पाकिस्तानातल्या मुलतान इथे झालेल्या कसोटीत पाहायला मिळाला. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांचा डोंगर उभारला. इतक्या धावा करुनही पाचव्या दिवशी पाकिस्तानवर डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. ५०० पेक्षा धावा करुनही डावाने पराभूत होणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ आहे.

हॅरी ब्रूक- जो रूटची जोडी जमली

हॅरी ब्रूकने दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानात खेळताना तीन सामन्यांच्या मालिकेत ३ शतकांसह ४६८ धावा लुटल्या होत्या. तो फॉर्म कायम राखत ब्रूकने या सामन्यात तडाखेबंद त्रिशतक झळकावलं. इंग्लंडसाठी त्रिशतक झळकावणारा तो केवळ सहावा फलंदाज ठरला. ३६ डिग्री तापमानातही आक्रमक खेळ करत ब्रूकने २९ चौकार आणि ३ षटकारांसह ३१७ धावांची अजिंक्य खेळी साकारली. वैयक्तिक खेळावर लक्ष केंद्रित न करता ब्रूकने अनुभवी साथीदार जो रूटसह चौथ्या विकेटसाठी ४५४ धावांची प्रचंड भागीदारी केली. रूटने ३५वं शतक झळकावताना संघाला अडचणीतून बाहेर काढलं. या खेळीदरम्यान रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूट ६व्या स्थानी आहे. रूटने १७ चौकारांसह २६२ धावांची मॅरेथॉन खेळी केली. या दोघांच्या भागीदारीने पाकिस्तानला निरुत्तर केलं.

England Beat Pakistan by 47 Runs and An Innings in Multan Test ENG vs PAK Harry Broke Triple Century Joe Root
PAK vs ENG: पाकिस्तानचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः उचलून ठेवतात…
Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Live Updates in Marathi
Rahul Gandhi on Haryana Election Result: हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाला…”

८२३ धावा फक्त १५० षटकात

इंग्लंडने ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना बॅझबॉल हा आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. ५५६ धावांसमोर खेळतानाही इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार आक्रमण केलं. इंग्लंडच्या प्रत्येक फलंदाजाने धावगती मंदावणार नाही याची काळजी घेतली. सलामीवीर झॅक क्राऊलेने ८५ चेंडूत ७८ तर बेन डकेटने ७५ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. खेळपट्टीवर ठाण मांडून राहण्यापेक्षा इंग्लंडच्या प्रत्येक फलंदाजाने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा आणि निर्जीव खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवला. इंग्लंडने ८२३ धावांचा डोंगर केवळ १५० षटकातच उभारला. रूट-ब्रुक जोडी बाद झाल्यावरही इंग्लंडने आक्रमण सुरूच ठेवलं.

३६ डिग्री तापमानात इंग्लंडचा दमदार खेळ

विदेशात कसोटी सामना जिंकणं हे सगळ्यात अवघड मानलं जातं. मुलतान इथे झालेल्या या कसोटीदरम्यान पारा ३६ डिग्री पल्याड पोहोचला होता. इंग्लंडच्या खेळाडूंनी पावणेदोन दिवस या उकाड्यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं. याच उकाड्यात त्यांनी ८२३ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडच्या राखीव खेळाडूंनी सातत्याने पाणी, एनर्जी ड्रिंक, ग्लोव्हज यांचा पुरवठा केला. दुखापतीमुळे ही कसोटी खेळू न शकलेला कर्णधार बेन स्टोक्स नियमित अंतरात ड्रिंक्स घेऊन येताना दिसला. घामामुळे दर दोन षटकांनंतर जो रूट ग्लोव्ह्ज बदलत होता असं हॅरी ब्रूकने सांगितलं. जो रूटचं किट सीमारेषेपलीकडे वाळत ठेवल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रचंड उकाडा आणि आर्द्रतेमुळे पाकिस्तानच्या अबरार अहमदला रुग्णालयात दाखल करावं लागलं. पण या वातावरणाशी जुळवून घेत इंग्लंडने दमदार खेळ केला.

दुसऱ्या डावात इंग्लंडची जीव तोडून गोलंदाजी

ज्या खेळपट्टीवर फलंदाजांनी आठशेपेक्षा जास्त धावा लुटल्या त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात १० विकेट्स पटकावल्या. अवघ्या ५५ षटकात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांतच गुंडाळला. दुखापतीमुळे प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन करणाऱ्या जॅक लिचने ४ तर गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. पाटा विकेट असं वर्णन केलं जाणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या अनुनभवी गोलंदाजांनी जेमतेम साडेतीन तासात पाकिस्तानला गुंडाळलं. गोलंदाजांच्या दिमाखदार कामगिरीमुळे इंग्लंडने अडीच सत्रं शिल्लक ठेऊनच अद्भुत असा विजय साकारला.

कर्णधार नाही, अनुभवी खेळाडू नाहीत तरी विजयी

दुखापतीतून न सावरल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत ऑली पोपकडे नेतृत्व सोपवण्यात आले. इंग्लंडच्या संघात जोस बटलर, जो बेअरस्टो, मोईन अली या अनुभवी खेळाडूंचा समावेश नाही. गेल्या वर्षी स्टुअर्ट ब्रॉडने तर काही महिन्यांपूर्वी जेम्स अँडरसनने निवृत्ती घेतल्याने इंग्लंडचं गोलंदाजी आक्रमण अतिशय अनुनभवी होतं. दुखापतीमुळे मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या संघाचा भाग नाहीयेत. ब्रायडन कार्सने या सामन्यात पदार्पण केलं. या सगळ्या गोष्टी असतानाही इंग्लंडने थरारक विजय मिळवला.