आयपीएलचा पहिला हंगाम २००८ मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता. जगातील पहिली क्रिकेट लीग असण्यासोबतच, आयपीएल ही सर्वात मोठी लीग देखील आहे. आयपीएलनंतर जगभरात अनेक टी२० लीगचे आयोजन करण्यात आले. आता परिस्थिती अशी आहे की या लीगमुळे खेळाडू आपल्या देशासाठी खेळू शकत नाहीत. या विषयावर बोलताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जगभरात सुरू असलेल्या अनेक लीगची चिंता वाढवली आहे.

असे काय म्हणाला सौरव गांगुली

सौरव गांगुली सोमवारी म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा टी२० लीगसाठी खेळाडूंची पसंती टिकाऊ नाही कारण भविष्यात फक्त काही आर्थिकदृष्ट्या सक्षम लीग चालवता येतील. जगभरात टी२० लीगच्या वाढत्या संख्येमुळे, खेळाडू आता देशासाठी खेळण्यापेक्षा फ्रँचायझी क्रिकेटला प्राधान्य देत आहेत. बिग बॅश लीगनंतर आता ही लीग यूएई आणि दक्षिण आफ्रिकेत होत आहे. याशिवाय वर्षाच्या शेवटी अमेरिकेत लीगचेही नियोजन आहे.”

Pakistan Opener Fakhar Zaman says Will miss playing in India in future ICC events ahead Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : ‘भारतात खेळण्याची उणीव भासेल…’, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पण दुबईत…’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
ILT20 2025 Dubai Capitals beat MI Emirates by1runs Gulbadin Naib Player of the match
ILT20 2025 : दुबईने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला चारली पराभवाची धूळ, निकोलस पूरनचे अर्धशतक ठरले व्यर्थ
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

हेही वाचा: Lata Mangeshkar: “तुझी सावली माझ्या पाठीशी राहील…”, सचिनला झाली लता दीदींची आठवण; लिहिला भावनिक संदेश

एका कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाला, “आम्ही जगभरात होणाऱ्या लीगबद्दल बोलत असतो. आयपीएल ही पूर्णपणे वेगळी लीग आहे. बिग बॅश लीग ऑस्ट्रेलियातही चांगली कामगिरी करत आहे आणि त्याचप्रमाणे द हंड्रेडने यूकेमध्येही चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेची लीगही चांगली कामगिरी करत आहे. या सर्व लीग क्रिकेट लोकप्रिय असलेल्या देशांमध्ये होत आहेत. मला विश्वास आहे की येत्या चार-पाच वर्षांत फक्त काही लीग टिकतील आणि त्या कोणत्या असतील हे मला माहीत आहे.”

पीएसएलची अवस्था बिकट आहे

गांगुलीच्या या वक्तव्यानंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या लीगचा ताण वाढला आहे. यामध्ये सर्वात मोठे नाव आहे ते पीएसएलचे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परदेशी खेळाडू कोणत्याही लीगला चमक दाखवतात. पीएसएलमध्ये परदेशी खेळाडूही सहभागी होतात आणि त्या खेळाडूंना डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत खूपच कमजोर आहे. अशा स्थितीत ही लीग दीर्घकाळ टिकणे कठीण वाटते.

हेही वाचा: Adani Row: ‘तुझ्याकडे अदानींचे शेअर्स आहेत?’ सेहवागच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, सोशल मीडियावर झाला ट्रोल

खेळाडूंना लवकरच समजेल

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष म्हणाले, “सध्या प्रत्येक खेळाडूला नवीन लीगमध्ये सामील व्हायचे आहे, परंतु कोणती लीग महत्त्वाची आहे हे येत्या काळात कळेल. अशा परिस्थितीत लीग क्रिकेटपेक्षा देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले जाईल.” तो पुढे म्हणाला, “मी बंगाल क्रिकेट असोसिएशनचा पाच वर्षे अध्यक्ष होतो आणि त्यानंतर तीन वर्षे बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. मी आयसीसीमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे आणि पायाभूत सुविधा आणि पाठिंब्यानेच खेळ शक्य आहे हे पाहिले आहे.”

Story img Loader