Road Safety World Series 2023 to be held in England: सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, ब्रायन लारा, ब्रेट लीसारखे दिग्गज खेळाडू आजही मैदानात आपल्या कामगिरीने सर्वांना चकीत करताना दिसतात. वास्तविक, हे दिग्गज रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज अंतर्गत खेळतात. गेल्या वर्षी झालेल्या या मालिकेत जगभरातील दिग्गजांच्या आठ संघांचा समावेश करण्यात आला होता. त्यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. यंदा पाकिस्तानचा संघही यात पहिल्यांदाच सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे भारताच्या आणि पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंमधील घमासान पुन्हा पाहिला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसरा हंगामाची सुरुवात सप्टेंबरमध्ये होणार –

या वर्षी सप्टेंबरमध्ये रोड सेफ्टी टी-२० लीगचा तिसरा मोसम खेळला जाणार आहे. ही लीग आतापर्यंत भारतात खेळवली गेली आहे, परंतु आगामी हंगाम इंग्लंडमध्ये होणार आहे. ईएसक्रिकइन्फोच्या बातमीनुसार, त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) कडून मंजुरी मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये लीग सुरू झाली. आतापर्यंत त्याचे दोन सीझन खेळले गेले आहेत. हे दोन्ही हंगाम भारतात खेळले गेले. तिसरा हंगाम सप्टेंबरच्या सुरुवातीपासून साधारण तीन आठवडे खेळला जाईल. लीगच्या आगामी आवृत्तीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ संघ सहभागी होणार आहेत. भारताच्या दिग्गज संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर आहे.

आतापर्यंत पाकिस्तान संघाचा समावेश नव्हता –

भारत आणि पाकिस्तान सरकारमधील तणावपूर्ण संबंधांमुळे आणि भारतात खेळल्या जाणार्‍या दोन हंगामांमुळे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये आतापर्यंत पाकिस्तानचा संघ नव्हता. मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या पहिल्या सत्रात भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सहभागी झाले होते, परंतु साथीच्या आजारामुळे केवळ चार सामन्यांनंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये रायपूरमध्ये उर्वरित सामने पुन्हा सुरू झाले, तेव्हा ऑस्ट्रेलियाने कोविड-१९ संबंधित प्रवासी निर्बंधांमुळे माघार घेतली आणि त्याची जागा इंग्लंड आणि बांगलादेशने घेतली.

हेही वाचा – IND vs WI: “मला लहानपणापासून ‘ही’ गोष्ट करायची होती पण…”; तिलकने किशनला सांगितली बालपणीची इच्छा, पाहा VIDEO

क्रिकेट चाहत्यांचा उत्साह वाढणार –

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सीझन सप्टेंबर २०२२ मध्ये डेहराडून आणि रायपूर येथे खेळवला जाईल. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनासह आठवा संघ न्यूझीलंड सामील झाला. स्पर्धेच्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये, इंडिया लीजेंड्स संघाने अंतिम फेरीत श्रीलंका लिजेंड्स संघाचा पराभव केला. पाकिस्तान संघाचा समावेश झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचा थरार वाढणार आहे. कारण पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान संघांच्या दिग्गज खेळाडूंमध्ये सामना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan team will participate in road safety world series 2023 to be held in england vbm