Pakistan and England Prize Money ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधून पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आता बाहेर पडले आहेत. गट स्पर्धेतून बाहेर पडूनही पाकिस्तान व इंग्लंडला माघारी जाताना मोठी रक्कम मिळणार आहे. ICC च्या बक्षिसांच्या यादीत पाकिस्तान व इंग्लंडसाठी नेमकी किती रक्कम आहे याविषयी अनेकांना कुतूहल आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानने नऊ गेममध्ये आठ गुणांसह पाचव्या स्थानावर आपली मोहीम संपवली. संघाने चार सामने जिंकले आणि उर्वरित पाच सामने गमावले. या स्पर्धेत नऊ सामने खेळून इंग्लंडला केवळ तीन सामन्यांत विजय मिळवता आले होते आणि उर्वरित सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला.
ग्रुप स्टेजमध्ये फक्त एक सामना बाकी असताना, गतविजेते नऊ गेममध्ये सहा गुणांसह सातव्या स्थानावर होते. दुसरीकडे, पाकिस्तानच्या आशा शेवटपर्यंत जिवंत होत्या. मेन इन ग्रीनला पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर येण्यासाठी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी गतविजेत्याला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागणार होते. मात्र इंग्लंडने पाकिस्तानला हरवून स्पर्धेतून आपल्या बरोबर बाहेर काढले.
पाकिस्तान इंग्लंडने विश्वचषकात किती कमाई केली?
दरम्यान संपूर्ण विश्वचषकाच्या दरम्यान, पाकिस्तानला प्रत्येक गट टप्प्यातील विजयासाठी ४०,००० डॉलर आणि गट टप्प्यातुन बाहेर पडताना १ लाख डॉलर मिळणार आहेत. एकूण, पाकिस्तानला २ लाख ६० हजार डॉलर बक्षीस मिळणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास २ कोटी १६ लाख ५७ हजाराहून अधिक आहे.
दुसरीकडे, इंग्लंडला प्रत्येक गट टप्प्यातील विजयासाठी ४० हजार डॉलर आणि गट टप्प्यातुन बाहेर पडताना १ लाख डॉलर मिळणार आहेत. एकूण, इंग्लंडला २०२३ च्या विश्वचषक मोहिमेनंतर २ लाख २० हजार डॉलर बक्षीस मिळणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास १ कोटी ८३ लाख २५ हजाराहून अधिक आहे.
हे ही वाचा<< विराट कोहलीच्या शतकावर उद्धट प्रतिक्रिया देणाऱ्या कुसल मेंडिसला उपरती! आता म्हणाला, “जेव्हा प्रश्न विचारला..”
दरम्यान, या विश्वचषकात, उपांत्य फेरीत पोहोचलेल्या सर्व संघांपैकी दोन संघ अंतिम फेरीत जातील, परंतु इतर दोन संघ जे उपांत्य फेरीत पोहोचतील परंतु पुढे जाऊ शकणार नाहीत, त्यांनाही प्रत्येकी ६.६३ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. यानंतर अंतिम फेरीतील विजेत्याला ३३. १८ कोटी तर उपविजेत्यांना १६.५९ कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.