आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे आयोजन पाकिस्तान करत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ एकाही विजयाशिवाय गट टप्प्यातूनच बाहेर पडला आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या चाहत्यांना काही सामन्यांच्या तिकिटांचे पैसे परत करणार आहे. पण हा निर्णय का घेण्यात आला, जाणून घेऊया.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) प्रेस रिलीज जारी करत पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत 3३ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. मात्र यातील दोन सामने एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दोन सामन्यांच्या तिकिटांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक सामना २५ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि दुसरा सामना २७ फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रावळपिंडी आणि लोहारमध्ये होणारे तीन सामने पावसामुळे रद्द झाले. रावळपिंडीतील दोन्ही सामन्यांची नाणेफेकही झाली नाही. तर लाहोरमधील सामना ओल्या आऊटफिल्डमुळे पुन्हा सुरू न होता रद्द करण्यात आला. आता यापैकी नाणेफेकही न होता रद्द झालेल्या सामन्यांचे पाकिस्तान पैसे परत करणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पीसीबी तिकीट परतावा धोरणानुसार, तिकीटधारकांना पूर्ण पैसे परत केले जातील. तिकीट धारक सोमवार, १० मार्च २०२५ आणि शुक्रवार, १४ मार्च २०२५ दरम्यान निवडक TCS आउटलेटवर त्यांच्या परताव्यासाठी अर्ज करू शकतात. यादरम्यान, तिकीटधारकांना मूळ तिकीट दाखवले जाईल. याशिवाय तिकीट धारकांना रिफंडचा दावा करण्यासाठी वैयक्तिकरित्या TCS आउटलेटवर जावे लागेल, परंतु हॉस्पिटॅलिटी तिकीट असलेल्यांना परतावा मिळणार नाही. पाकिस्तानने १० TCS आउटलेटची घोषणा केली आहे जिथे चाहत्यांना त्यांचा परतावा मिळू शकतो.

चॅम्पियन्स ट्रॉफीत ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या नावांचा समावेश आहे. यादरम्यान एक उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तानमध्ये आणि भारताचा उपांत्य सामना दुबईमध्ये खेळवला जाईल.

Story img Loader